Video: पाकिस्तानी निवेदकाने दीपिका आणि प्रियांकावर केली टीका

Mumbai
pakistani tv host waqar zaka criticize on deepika padukone and priyanka chopra
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० हटवण्याचा मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच जम्मू-काश्मीर हे विधानसभा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत देखील केलं आणि टिकाही केली. तसेच या निर्णयानंतर सर्वात जास्त खवळला तो पाकिस्तान. या निर्णयानंतर पाकिस्ताने भारतासोबतचा व्यापार बंद केला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस आणि थार एक्सप्रेस बंद केली आणि त्यानंतर भारतीय चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली, असे अनेक वेगवेगळे निर्णय पाकिस्ताने घेतले आहेत. आता यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाकिस्तानी ट्रोलर्सनी भारतीय कलाकारांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानच्या एका निवेदकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर टीका केली आहे. या पाकिस्तानी निवेदकाने असं म्हटलं आहे की, ‘मला दीपिकाला पाहिल्यानंतर उलटी येते’, असं तो व्हिडिओत म्हणाला आहे.

पाकिस्तानचा या निवेदक वकार जका याने टि्वटर आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओमध्ये भारतीय कलाकारांवर टीका केली आहे. भारतीय मुलां-मुलींपेक्षा पाकिस्तानचे मुले आणि मुली खुप सुंदर दिसतात असं म्हटलं आहे. भारतीय मुलं ही प्रोटीन खाऊन फक्त मोठे झाले आहेत. तसेच त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे अशी विनंती केली आहे की, भारतीय अभिनेत्रींचे बिलबोर्ड्स लावू नये.

नक्की वाचानवरा नवरी मांडवातून निघाले आणि……

वकार जकाने असं म्हटलं आहे की, ‘जर पाकिस्तानमध्ये बड्या कंपन्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कृपा करून जाहिरातीसाठी भारतीय अभिनेत्रींचे बिलबोर्ड पाकिस्तानमध्ये लावू नयेत. पाकिस्तानमध्ये जेवढे बिलबोर्ड्स असतील ते सर्व हटविण्यासाठीचे उपाय करावे अशी माझी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विनंती आहे.’

तसेच त्याने दीपिका आणि प्रियांका विषयी असं म्हटलं की,’मी जेव्हा दीपिकाला प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा उलटी आली होती. तसेच ज्यावेळी मी प्रियांका चोप्रोला दुबईमध्ये पाहिलं तेव्हा ती कोणत्या प्रकारचा मेकअप करते? कोणत्या प्रकारची जादु करते? तिला पाहिल्यानंतर अत्यंत किळस वाटली होती.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे.


हेही वाचामोदी हिंदीत बोलले, मग बेअर ग्रिल्सला कसं कळायचं?