घरमनोरंजनगश्मीर नाही तर 'हा'अभिनेता करणार 'प्रेमा तुझा रंग कसा' चे सुत्रसंचालन!

गश्मीर नाही तर ‘हा’अभिनेता करणार ‘प्रेमा तुझा रंग कसा’ चे सुत्रसंचालन!

Subscribe

स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा? ही मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या पर्वानंतर आता प्रेमा तुझा रंग कसाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वाचे सुत्रसंचलन गश्मीर महाजनी करणार नाहीये.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हे पहिलं पर्व गाजलं. या पर्वातून केवळ गुलाबी प्रेम न दाखवता प्रेमाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आली. पहिल्या पर्वात प्रेम, त्यातून घडणारे गुन्हे आणि त्याचा तपास दाखवण्यात आला होता. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता गश्मीर महाजनीने केलं होत. पहिल्या पर्वाचा प्रतिसाद बघता स्टार प्रवाहने ‘प्रेमा तुझा रंग कसा? चे दुसरं पर्व सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

‘प्रेमा तुझा रंग कसा? च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता अजिंक्य देव करणार आहे. या कार्यक्रमातून केवळ प्रेमा विषयी नाही तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्हांच्या घटानांविषयी माहिती प्रेक्षकांना झाली. या मालिकेतून समाजात घडणाऱ्या घटनांविषयी जागृती प्रेक्षकांमध्ये झाली, त्यामुळेच या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. गश्मीर महाजनीचं सुत्रसंचलनही प्रेक्षकांना आवडलं.

- Advertisement -

आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा? चे दुसरे पर्व प्रेक्षकांना १७ सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता बघता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -