प्रिया वॉरियरच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे बदला निर्णय – दिग्दर्शक

प्रिया वॉरियरच्या त्या व्हिडिओमुळे निर्णय बदल्याचा खुलासा 'ओरु अदार लव्ह'चे दिग्दर्शक ओमर लुलू यांनी केला आहे.

Mumbai
priya prakash varrier forcefully made the female lead in oru adaar love director makes revelations
प्रिया वॉरियरच्या त्या व्हिडिओमुळे बदला निर्णय

नजरेने तरुणांना घायाळ करुन सोडणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर रातोरात स्टार झाली असून ‘नॅशनल क्रश’ म्हणून देखील ही ओळखली जाऊ लागली आहे. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रिया वारियर ही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला प्रिया या चित्रपटात मुख्य नाही तर सहअभिनेत्रीच्या भूमिकेत असल्याचा खुलासा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला आहे.

दिग्दर्शक काय म्हणाले?

‘ओरु अदार लव्ह’चे दिग्दर्शक ओमर लुलू याविषयी म्हणाले, ‘प्रियाचा डोळा मारतानाचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. व्हिडिओत प्रियाच्या अभिनयाची एक झलक होती, त्यामुळे प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटाची उत्सुकता वाटू लागली होती. चित्रपट आणखी दमदार व्हावा, त्याची कथा उत्तम व्हावी असे मला वाटले. त्याबद्दल बोलण्यासाठी मी निर्मात्यांकडे गेलो. पण त्यांनी अचानक प्रियाला मुख्य अभिनेत्री करण्यास सांगितले. चित्रपटात प्रियाला केंद्रस्थानी ठेवून कथासुद्धा बदलण्याचे फर्मान निर्मत्यांनी सोडले. आधी चित्रपटाची कथा वेगळी होती. पण प्रियासाठी पूर्ण संकल्पनाच बदलली गेली.’

ही अभिनेत्री साकारणार होती मुख्य भूमिका

चित्रपटात प्रियाच्या जागी नूरिन शरीफ ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणा होती. पण निर्मात्यांच्या अटीमुळे तिच्या भूमिकेला कमी महत्त्व देण्यात आल्याचंही दिग्दर्शकांनी सांगितलं आहे. नूरिन ही प्रियापेक्षा चांगली अभिनेत्री असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नूरिन शरीफ हिनेही प्रियामुळे तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता.


वाचा – ‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर हिट

वाचा – प्रिया वॉरियरचा Kissing सीन व्हायरल…


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here