लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने शेअर केला व्हिडीओ

तिचे फोटो पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनी प्रियांकाच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक केले आहे.

Mumbai
priyanka and nick
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (सौजन्य-एएनआय)

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी कालच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. मागील वर्षी म्हणजेच १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका आणि निक यांचा विवाह पार पडला. या निमित्ताने प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले केले आहेत. तिचे फोटो पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनी प्रियांकाच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक केले आहे.

सर्वांचे आभार मानले

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पती निक जोनास सोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘आज आणि येणाऱ्या पुढील सर्वच दिवसांसाठी हे वचन आहे. तू मला एका क्षणातच आनंद, उत्साह सर्व काही दिले. मला शोधल्यामुळे मी तुझी आभारी आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीराज’ अशी पोस्ट करत प्रियांका चोप्राने तिला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.