घरमनोरंजनVideo: 'द स्काय इज पिंक'च्या प्रिमीअरमध्ये प्रियांका झाली भावूक

Video: ‘द स्काय इज पिंक’च्या प्रिमीअरमध्ये प्रियांका झाली भावूक

Subscribe

चित्रपटाचे कौतुक होताना पाहून हळव्या मनाच्या प्रियांकाला अश्रू झाले अनावर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून बॉलिवूडक्षेत्रात पुन्हा कमबॅक करणार आहे. सध्या प्रियांका आणि फरहान अख्तर दोघेही याच चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल सोहळ्यात प्रियांका भावूक झाली आणि तिला तिचे अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

टोरंटो फिल्म फेस्टिवल दरम्यान ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, चित्रपट दिग्दर्शिका सोनाली बोस उपस्थित होते. यावेळी त्याच्या चित्रपटाचे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी भरभरून दाद देऊन कौतुक केले. हे कौतुक करताना प्रेक्षकांनी पाच मिनिटे उभे राहून टाळ्या देखील वाजवल्या.

- Advertisement -

हे कौतुक पाहून प्रियांका भावूक झाली होती. हा कौतुकाचा प्रसंग पाहून हळव्या मनाच्या प्रियांकाला अश्रू अनावर झाले. यावेळी प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून स्टारकास्टसह सोनाली बोस यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. दरम्यान ती भावूक झाली आणि हा व्हिडिओ viralbhayaniने इंस्टाग्रामवर शेअऱ केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -