जगातल्या ‘मोस्ट पॉवरफुल वुमन्स’च्या लिस्टमध्ये ‘देसी गर्ल’

या यादीत प्रियांकासोबत ऑपरा विनफ्रे, बियॉन्से, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचादेखील समावेश आहे.

Mumbai
प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या बॉलिवूड क्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतर आता हॉलिवूडमध्येही उत्कृष्ट अभिनय शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यानंतर आजतागायत तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. म्हणूनच ही अभिनेत्री आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाचे देखील नाव घेतले जाते.

आणखी एका सन्मानाची भर

यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री प्रियांकाला ‘टॉप ५० शक्तीशाली महिलां’मध्ये सहभागी करण्यात आले आहे. ‘मिस वर्ल्ड २०००’ ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. या यादीत प्रियांकासोबत ऑपरा विनफ्रे, बियॉन्से, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचादेखील समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

@eliesaabworld ???

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

‘या यादीत माझ्यासोबत ज्या महिलांचा समावेश आहे या सर्व महिलांना आपल्या आयुष्यात संघर्षाचा सामना केल्याने आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.’ असे मनोरंजन क्षेत्रातील ‘५० शक्तीशाली महिलां’च्या यादीत समावेश झाल्यावर तिने म्हटले आहे. यासोबतच ती असेही म्हणाली की, ‘प्रसिद्ध असलेल्या टॉप ५० शक्तीशाली महिलांमध्ये माझा सहभाग झाल्याने मला अभिमान वाटत आहे, आतापर्यंत जी मेहनत केली त्याचेच फळ मिळत आहे. ‘

बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक

‘द स्काय इज पिंक’ मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या सिनेमा pulmonary fibrosis पीडित आयशा चौधरी हिच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात प्रियांकासोबतच जायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here