प्रियंका – निकचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन

प्रियंका -निकच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त प्रियंकाच्या जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत.

Delhi
priyanka chopra and nick jonas
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस लग्नानंतर आज दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. निकयंका आज दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. प्रियंका आणि निकच्या या ग्रँड रिसेप्शनसाठी खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त प्रियंकाच्या जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत.

दिल्लीनंतर मुंबईत रिसेप्शन

प्रियंका आणि निकने लग्नापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रिसेप्शनचे आमंत्रण दिले होते. पंतप्रधानांसह उद्योजक मुकेश अंबानी, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका आणि निक यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईत रिसेप्शन कोणत्या दिवशी असणार आहे याबद्दल अद्याप काहीच माहिती समोर आली नाही. असे सांगितले जात आहे की, मुंबईतल्या रिसेप्शनला प्रियंका आणि निक संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रित करणार आहे. १ आणि २ डिसेंबरला प्रियंका आणि निकने जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते.

सोनाली बेंद्रे येण्याची शक्यता

सहा महिने अमेरिकेत कॅन्सरचा उपचार करुन भारतात परतलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे प्रियंका आणि निकच्या रिसेप्शनला येण्याची शक्यता आहे. प्रियंका सोनाली बेंद्रेची नणंद सृष्टी आर्याची जवळची मैत्रिण आहे. त्यामुळे या रिसेप्शनला सोनाली बेंद्रे येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – 

देसी गर्ल प्रियंकाच्या स्वागतासाठी घर सजले

प्रियंका चोप्रा – निक जोनस प्रेमबंधनात