राझी १०० कोटी क्लबमध्ये झाला दाखल

Raazi
राझी चित्रपटातील दृष्यं

आजपर्यंत आलिया भटने काम केलेले बहुतेक चित्रपट १०० कोटीमध्ये दाखल झाले आहेत. ‘राझी’देखील याला अपवाद ठरला नाही. ‘राझी’ने या आठवड्यात १०० कोटी क्लबमध्ये आपला जागा मिळवली आहे. तिसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने १०० कोटीची कमाई केली आहे.

१०४.३२ कोटीची कमाई

विकी कौशल, आलिया भट आणि सोनी राझदान यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई करण्यास सुरुवात केली होती. २०१८ या वर्षीच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘राझी’ ठरला असून आतापर्यंत या चित्रपटाने १०४.३२ कोटी इतकी कमाई केली आहे.

राझी चित्रटातील गुप्तहेर लोकांना भावली

आलिया भटने ‘राझी’ चित्रपटामध्ये एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलिया भारतीय गुप्तहेर असून तिचं एका पाकिस्तानी पोलिस ऑफिसरसोबत लग्न होते. पाकिस्तानातून ती देशासाठी कसे काम करते याभोवती ही कथा गुंफलेली आहे. हरिंदर सिक्का यांच्या ‘ कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर ‘राझी’ चित्रपट आधारित आहे. ही एक सत्यकथा असून मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विकी कौशल, अमृता खानविलकर यांच्या भूमिकादेखील सध्या चर्चेत आहेत.

इतका चांगला प्रतिसाद अपेक्षित नव्हता – आलिया

“आम्हाला सुरुवातीपासूनच असं वाटलं होतं की, आम्ही एक लहान बजेट चित्रपटाची निर्मिती करत आहोत, त्यामुळे प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळेल याबाबत थोडे साशंक होतो. पण मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला आहे.” असं आलियानं सांगितलं आहे. “हे सगळं मेघनामुळे शक्य झालं कारण या चित्रपटासाठी माहीत नाही ती किती रात्र जागी राहिली आहे? हे यश तिचं आहे. आम्ही आमचं काम केलं. या यशामुळे मी खूपच आनंदी आहे.” असंही आलियानं नमूद केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here