रामोजी फिल्म सिटी अनुभवणार ‘साहो’चा थरार

बाहुबली प्रमाणेच 'साहो'चा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम म्हणजेच प्री रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोज हैदराबाद येथील 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये हा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रभास आणि श्रद्धा कपूर सह चित्रपटाची संपूर्ण चमू देखील उपस्थित राहणार आहे. त

Hyderabad
Ramoji Film City will experience the thrill of Saaho
रामोजी फिल्म सिटी अनुभवणार ‘साहो’चा थरार

अभिनेते प्रभास त्यांच्या आगामी ‘साहो’ चित्रपटच्या ट्रेलरला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर निर्मात्यांनी आता आपले संपूर्ण लक्ष प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाकडे वळविले आहे. बाहुबली प्रमाणेच ‘साहो’चा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम म्हणजेच प्री रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोज हैदराबाद येथील ‘रामोजी फिल्म सिटी’मध्ये हा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रभास आणि श्रद्धा कपूर सह चित्रपटाची संपूर्ण चमू देखील उपस्थित राहणार आहे. तसेच याच वेळी चित्रपटातील गाणे अधिकृतपणे प्रदर्शित केले जातील. २०१७ साली मार्च महिन्यात ‘बाहुबली’चा दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये भव्य कार्यक्रम झाला होता. तसेच चेन्नईमध्ये देखील अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे बाहुबली नंतर ‘साहो’ हा प्रभासचा पहिलाच चित्रपट असून जवळपास २ वर्षांपासून प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘साहो’ ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

‘साहो’चा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. बाहुबली नंतर प्रभास एका वेगळ्याच रूपात समोर आला आहे. ट्रेलरला सिनेसमीक्षक तसेच चाहत्यांकडून सामाजिक माध्यमांवर भरगोस प्रतिसाद मिळतो आहे. साहोच्या ट्रेलरला आतापर्यंत ५१ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी विविध डिजिटल माध्यमावर पाहिले आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर सध्या सामाजिक माध्यमांवर अग्रस्थानी ट्रेंड होत आहे. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर ‘साहो’ तेलुगू सोबतच तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे साहो चित्रपटासाठी प्रभासने हिंदीचे प्रशिक्षण घेतले असून स्वतः हिंदी भाषेतून डबिंग केले आहे. ‘साहो ‘ चित्रपटाचे टिझर १३ जूनला प्रदर्शित करण्यात आले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दोन गाण्यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Ramoji Film City will experience the thrill of Saaho

‘या’ कलाकारांनी केला आहे अभिनय

‘साहो’ चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर, मंदिर बेदी, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, अरुण विजय, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि लाल सारखे सुविख्यात अभिनेते काम करणार असून शंकर-एहसान -लॉय यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘साहो’ची निर्मिती यु व्ही क्रीएक्शन या प्रमुख निर्मिती संस्थेच्या अंर्तगत झाली असून टी सिरीज आणि अनिल थडानी यांची संस्था ए. ए फिल्म्स सुद्धा या चित्रपटात सहभागी आहे तर दिग्दर्शन सुजीत रेड्डी यांचे आहे.

‘साहो’वर आधारित गेम

‘साहो’ चित्रपटावर आधारित एक मोबाईल गेम तयार करण्यात आला असून १५ ऑगस्ट रोजी लॉन्च केला जाणार आहे. ‘साहो दि गेम’ या नावाने हा मोबाईल गेम तयार करण्यात आला आहे. ‘साहो’च्या टिझर प्रमाणेच मोठे ऍक्शन सिक्वेन्सचा या खेळात समावेश करण्यात आला आहे. या स्टाईलिश खेळाची निमिर्ती पिक्सालॉट लॅब्ससद्वारे करण्यात आली आहे.