रणबीर आलियाचा ‘इश्क वाला लव्ह’

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा झी सिने अवॉर्डमधील रोमान्सने भरलेला हा डान्स आहे.

Mumbai
Ranbir aaliya
रणबीर कपूर, आलिया भट

आलिया आणि रणबीरचं अफेअर आता कोणासाठीच नवीन राहिलं नाही. गेले काही दिवस ते सतत एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. बॉलिवूडचे हे लव्ह बर्ड्स आपलं हे नातं कोणापासून लवपवताना ही दिसत नाही. झी सिने अवॉर्ड शोमध्ये पुन्हा एकदा या दोघांचा रोमांन्स खुल्लम खुल्ला बघायला मिळाला.

नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अॅवॉर्ड्स’मध्ये रणबीर-आलियाने विशेष लक्ष वेधून घेतलं. या ‘लव्ह-बर्ड्स’ने स्टेजवर कपल डान्स करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. आलियाच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातील इश्क वाला लव्ह या गाण्यावर दोघांनीही सुंदर कपल डान्स केला. हा डान्स करताना आलियाला उचलून घेत केलेला हा डान्स सध्या सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 या कार्यक्रमानंतर या दोघांचे हातात हात घालून बाहेर पडले. हे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशलमिडीयावर व्हायरल होत आहेत. शो संपल्यानंतर रणबीर आणि आलिया दोघेही एकाच वेळी बाहेर पडले. यावेळी रणबीरने आलियाचा हात घट्ट पकडला होता. मिडीयाच्या नजरा त्यांच्याकडे असतानाही ते दोघे बिनधास्त हातात हात घालून निघून जाताना दिसले.

 

View this post on Instagram

 

[More Pictures] Ranbir Kapoor and Alia Bhatt snapped leaving #ZeeCineAwards2019 last night. #RanbirKapoor #Ranbir #AliaBhatt #Bollywood

A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

लवकरच आलिया आणि गणबीर ब्रह्मास्त्र चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ब्रमाह्स्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते दोघेही लग्न करणार आहेत. अशी चर्चा आहे. गेले काही दिवस आलियाही रणबीरच्या घरच्यांबरोबर वेळ घालवताना दिसली. आलियाचे वडिल महेश भट्ट यांनी देखील या दोघांचे नातं मान्य केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here