घरमनोरंजनVideo : तुम्हाला माहितेय का सविता भाभी कोण आहे ते?

Video : तुम्हाला माहितेय का सविता भाभी कोण आहे ते?

Subscribe

गेले काही दिवस सविता भाभी ...तू इथंच थांब!!! हे असं लिहीलेलं पोस्टर व्हायरल होतं. सोशल मीडियावर याचीच चर्चा होती.

गेले काही दिवस सविता भाभी …तू इथंच थांब!!! हे असं लिहीलेलं पोस्टर व्हायरल होतं. सोशल मीडियावर याचीच चर्चा होती. मात्र या पोस्टर कसलं आहे याचा उलगडा झाला आहे. लवकरच ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही सविता भाभी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात सविता भाभी कोण हे कळलं. सई ताम्हणकर या सिनेमात सविता भाभीची व्यक्तीरेखा साकारत आहे.

 

- Advertisement -

प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आलोक राजवाडेचे‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण होत आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात सईसोबत पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. जवळपास २.३५ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला सई मादक आवाजात ‘आतिश’ नाव घेते. यावेळी तिची धुसरशी प्रतिमा दिसते.

या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे.आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद धर्मकीर्ती सुमंत यांचे आहेत. चित्रपटाला साकेत कानेटकर यांनी संगीतबद्ध केले असून आलोक राजवाडे, ऋतुराज शिंदे, विराट मडके, साकेत कानेटकर यांनी पार्श्वगायन केले आहे. साकेत कानेटकर आणि ओंकार कुलकर्णी गीतकार आहेत. टीनएजर मुलाची सेक्शुअल फँटसी ते खऱ्या प्रेमाचा अर्थ म्हणजे नक्की काय? याचा उलगडा करणारा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -