घरमनोरंजन....म्हणून सैफला स्वीकारायचा नव्हता 'पद्मश्री' पुरस्कार!

….म्हणून सैफला स्वीकारायचा नव्हता ‘पद्मश्री’ पुरस्कार!

Subscribe

अभिनेता सैफ अली खानला २०१० मध्ये ‘पद्मश्री’पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर सैफला देण्यात आलेल्या पुरस्कारावरून वाद निर्माण झाला. सैफला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं होतं. या प्रकरणावर अखेर सैफने मौन सोडले आहे. ‘मला पुरस्कार स्वीकारायचा नव्हता’असं सैफने अरबाज खानच्या चॅट शोमध्ये सांगितलं आहे.

पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर हॉटेल मारहाण प्रकरणामुळे सैफला देण्यात आलेल्या पुरस्कारावरून वादंग निर्माण झाला होता.सैफने पद्मश्री पुरस्कार विकत घेतला अशी टीकासुद्धा सोशल मीडियावर झाली होती. या सगळ्यावर सैफने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

- Advertisement -

काय म्हणाला सैफ

अरबाजच्या चॅट शो मध्ये सैफला याबद्दल विचारले असता सैफ म्हणाला,‘पद्मश्री पुरस्कार हा विकत घेतला जाऊ शकतो का? भारत सरकारला लाच देऊन हा सन्मान विकत घेण्याइतकी माझी कुवत नाही. मला वाटतं मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला नको होता. चित्रपटसृष्टीत माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ अभिनेते आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. पण माझ्यापेक्षाही कमी पात्र असलेल्यांनाही हा पुरस्कार मिळाल्याची मला खंतही वाटते.’‘मला पुरस्कार परत करायचा होता. पण भारत सरकारने दिलेला सन्मान नाकारण्याइतपत स्थान तू अजून मिळवलं नाहीस असं वडिलांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी तो पुरस्कार आनंदाने स्वीकारला,’ असं तो म्हणाला.

View this post on Instagram

#phantom

A post shared by saif ali khan (@saif_alikan) on

- Advertisement -

सैफ अली खानला २०१० मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावर्षी अभिनेत्री रेखा, बॉक्सर विजेंदर सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -