सलमान खानच्या ‘इन्शाअल्लाह’चा मुहुर्त टळला

Mumbai
salman khan and alia bhatt starrer sanjay leela bhansali inshaallah movie date postpone
सलमान खानच्या 'इन्शाअल्लाह'चा मुहुर्त टळला

१९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सुमारे २० वर्षानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा ‘इन्शाअल्लाह’ चित्रपटातद्वारे एकत्र आले आहेत. मात्र ‘इन्शाअल्लाह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर गेली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून पहिल्यांदा सलमान खान आणि अलिया भट्टची जोडी मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तसेच अलिया भट्ट देखील पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी सोबत काम करणार आहे.

सलमान खानने ‘इन्शाअल्लाह’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२०मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याची माहिती ट्वविट केली आहे. या चित्रपटाची तारीख पुढे ढकल्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. तसेच या चित्रिपटाची निर्मित संजल लीला भन्साळी आणि सलमान खान करत आहेत.


हेही वाचाअनुष्का शर्माच्या घरी आली नवी पाहूणी; फोटो शेअर करून केले स्वागत


‘इन्शाअल्लाह’ हा चित्रपट हॉलिवूडच्या एका चित्रपटातून प्रेरित होऊन तयार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हॉलिवूडचा १९९० साली रिलीज झालेला ‘प्रीटी वूमेन’ या चित्रपटावर ‘इन्शाअल्लाह’ आधारलेला आहे. ‘प्रीटी वूमेन’ हा चित्रपट हॉलिवूडचा रोमँटिक चित्रपट म्हणून प्रसिद्ध होता. रिचर्ड गेरे आणि ज्यूलिया रॉबर्ट यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

‘इन्शाअल्लाह’चं शूटिंग हे अमेरिकेत सुरू केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सलमान खानला एखाद्या डिजीटल प्लॅटफॉर्म एजन्सी किंवा चॅनलसोबत करार कराव लागतो. सलमान खानला या करारात मिळालेली रक्कम ही चित्रपटात काम केल्याचा मोबदला म्हणून मिळते.


हेही वाचा‘या’ कारणामुळे अभिनेत्री जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी केले ट्रोल