Video: भाईजान सलमान ‘चाचू’चा फॅमिली टाईम!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान चित्रपटातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत काही खास वेळ घालवतानाचे व्हिडिओ व्हायरल

Mumbai
सौ. indian express.com

बॉलिवूडचे भाईजान म्हणजे सलमान खान ‘भारत’ चित्रपटाच्या धमाकेदार ओपनिंगनंतर त्याच्या आगामी ‘इंशाअल्लाह’ चित्रपाटाच्या तयारीत व्यग्र आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान चित्रपटातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत काही खास वेळ घालवत आहे. नेहमीच सलमान खान त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो, व्हिडिओमुळे चर्चेत असतो. नुकताच सलमानने क्‍वॉलिटी टाईम व्यतित करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर सलमानने तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये सलमान त्याच्या पुतण्यांसोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सलमानचे चाहते सोशल मीडिय़ावर चांगलाच व्हायरल करत आहे.

पहिल्या व्हिडिओमध्ये सलमान आपल्या अरबाज आणि सोहेल या भावंडाच्या मुलांसह अरहान खान आणि निरवान खान यांच्यासह दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान आणि अरहान-निरवान ‘हँड स्‍लॅप’ हा खेळ खेळताना रेफरीच्या भूमिकेत दिसत आहे.

View this post on Instagram

Nirvaan vs Arhaan …

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दूसऱ्या व्हिडिओमध्ये सलमान अरहानसोबत ‘हँड स्‍लॅप’ हा खेळ खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटांशिवाय सलमान खान आपल्या कुटुंबासह चांगला वेळ घालवताना दिसतो.

View this post on Instagram

Arhaan vs me ..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

तिसऱ्या व्हिडिओमध्ये सलमान आपल्या भाच्यासह अयान अग्निहोत्री सोबत ‘हँड स्‍लॅप’ हा खेळ खेळताना दिसत आहे.

View this post on Instagram

Ayaan vs me ..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या व्हिडिओसोबतच सुल्तान सलमान खानचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एक घोड्यासोबत शर्यत लावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान संपुर्ण जोशात घोड्यासोबत शर्यतीत धावताना दिसत आहे. यामध्ये सलमान खान घोड्याला मागे टाकत फिनिशिंग लाईनपर्यंत पोहचताना त्याची दमछाक उडालेली दिसतेय. तरी देखील सलमानच्य़ा चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे.

View this post on Instagram

Overpower horse power … fun run with @iamzahero

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on