मुन्नाभाई-सर्किट पुन्हा एकत्र झळकणार ‘या’ चित्रपटात!

Mumbai

संजय दत्त आणि अर्शद वारसी ही जोडी प्रेक्षकांमध्ये नेहमीच हीट ठरते. मुन्नाभाई आणि सर्कीट म्हटलं की ही जोडी डोळ्यासमोर येते. आणि मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपटही डोळ्यासमोर उभा राहतो. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधली त्यांची मुन्ना आणि सर्किट ही जोडी खूप गाजली होती. पण या चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा कधी एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे या दोघांची जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार यासाठी चाहते वाट बघत होते. पण आता चाहत्यांना फार काळ वाट बघायची गरज नाही. कारण लवकरच हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

View this post on Instagram

Ready for the #Pagalpanti 🤩

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi) on

मात्र यावेळी ते ‘मुन्नाभाई’च्या सिक्वेलसाठी एकत्र दिसणार नाहीये तर एका वेगळ्या नवीन सिनेमात झळकणार आहेत. ‘संजू आणि मी पुढील वर्षी येणाऱ्या एका सिनेमात एकत्र काम करणार आहोत. सिनेमाचं नाव ठरलं नसून, दिग्दर्शक साजिद-फरहाद याचं दिग्दर्शन करणार आहेत.’ असं अर्शद या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला.

आता या चित्रपटाच नेमकं नाव काय असणार आहे. यात कोण कोण कलाकार आहेत हे लवकरच कळेल.