घरमनोरंजननेहा धुपियाचे 'गडबडी'त लग्न

नेहा धुपियाचे ‘गडबडी’त लग्न

Subscribe

नेहा धुपिया आणि अगंद बेदी यांनी गडबडीत केलेल्या लग्नाच्या निमित्ताने बऱ्याच चर्चा सुरू आहेत. लग्नाला इतकी घाई का केली, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना नेहाच्या वडिलांनी या चर्चेला सध्या पूर्णविराम दिला आहे. नेहा आणि अगंद बऱ्याच दिवसापासून डेटिंग करत होते. नेहा गरोदर असल्यामुळेच हे लग्न गाजावाजा न करता केले, असे बोलले जात होते. या विषयावर नेहाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही. त्यामुळे यावर जोरदार गॉसिप सुरु झाले. त्यामुळे नेहाच्या वडिलांनी प्रदीप धुपिया यांनी यावर आता उत्तर दिले आहे.

नेहा आणि अगंद दोघेही आपापल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप बिझी असतात. त्यांच्याकडे लग्नाच्या तयारीसाठी जास्त वेळ नव्हता. त्यांनी घरातल्यांच्या परवागीने हा निर्णय घेतला. लोकांना अशा गोष्टीतून काही वेगळेच अर्थ काढायचे असतात. या आधी देखील सोशल मीडियावर अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. बांद्रयात ते दोघं रात्रीच्यावेळी फिरतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुद्दयावरूनही पब्लिकने नेहाला ट्रोल केले होते. यावर सुध्दा अगंद बेदीने सोशल मिडीयावर ट्रोलकरांना प्रत्युतर दिले.  ज्यात खरेतर काहीच तथ्य नसते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

अगंद आणि नेहा हे १० मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. जगातील सर्वात मोठ्या आनंदापैकी एका म्हणजे आपल्या बेस्टफ्रेंड बरोबरच आपले लग्न होणे यापेक्षा आनंदाची गोष्ट काय, अशी प्रतिक्रिया नेहा आणि अगंद दोघांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -