शाहरूखच्या झिरोने नोंदवला ‘हा’ नवीन रेकॉर्ड

शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर युट्यूबवर प्रासारित करण्यात आला आहे. मागील चार दिवसांमध्ये या ट्रेलरला १० कोटी व्ह्यूज मिळाले आहे. कमी वेळात जास्त व्ह्यूज मिळवल्याने नविन रेकॉर्ड बनवला आहे.

Mumbai
zero
झिरो चित्रपटाचा पोस्टर

शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘झिरो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबर टाकण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगाल प्रतिसाद मिळाला आहे. मागील चार दिवसात १० कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहे. इतक्या कमी वेळात जास्त व्यूज मिळवणारा हा एकमेव चित्रपट ठरला आहे. युट्यूबबरोबरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही हा ट्रेलर गाजतो आहे. शाहरूखच्या आगामी चित्रपटात त्याने एका लहान माणसाची भुमिका साकारली आहे. चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ ही दिसणार आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. शाहरूख आपल्या चित्रपटांमध्ये काही वेगळे करण्याच्या प्रयत्नात दिसतो. शाहरूखच्या फॅन चित्रपटानंतर झिरो चित्रपटामध्ये शाहरूखने एक आव्हानात्मक भूमिका केली आहे.

शाहरूखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. शाहरूखची आगामी चित्रपटातील भूमिका बघण्यासाठी त्याच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे. शाहरूखच्या वाढदिवशी त्याच्या फॅन्सनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला होता. शारीरिक व्यंगाकडे दुर्लक्ष करत आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगण्याचा संदेश या चित्रपटातून दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here