शाहरुख-सलमानची जोडी पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करणार!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार

‘करण-अर्जुन’नंतर अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान या दोन अभिनेत्यांनी पुन्हा एकत्र काम करावे आणि पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकावे, अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. मात्र या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे दिसतेय. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पठाण’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील झळकणार आहे. या दोन सुपरस्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या वृत्ताने दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा शाहरुखने केलेली नाही. तरीही या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी आता त्यांचे चाहते करू लागले आहेत. तर शाहरुखने दोन वर्षांपूर्वी ‘झिरो’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट तिकिटबारीवर जोरदार आपटला होता. त्यानंतर दोन वर्षानंतर शाहरुखने एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सलमान या चित्रपटात एक लहानसा कॅमियो सीन देणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. सिद्धार्थ आनंद याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार याबाबत कुठलीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. येत्या काळात शाहरुख या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.


बॉबी देओलची वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेकडून बंदीची मागणी