घरमनोरंजनविद्या बालनच्या 'शकुंतला देवी' चित्रपटाचा टीझर आऊट!

विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाचा टीझर आऊट!

Subscribe

अभिनेत्री विद्या बालन यांच्या गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्यावर आधारीत बायोपिकचा फर्स्ट लुक समोर आला आहे. ह्युमन कम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री विद्या बालन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात झाली असल्याचेही तिने नमूद केले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन करणार आहेत. तर विक्रम मल्होत्रा या चित्रपटाची निर्मीती करतील. २०२० च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून ओळखले जाते. लहानपणापासून त्यांना गणित विषयाची आवड होती. त्या एक महान गणितज्ञ होत्या. १९८२ मध्ये त्यांच्या नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली. शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ मध्ये बँगलोरला एका ब्राम्हण कुटूंबात झाला. २०१३ ला गुगुलने डुडलच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. अशा महान शकुंतला देवी यांच्यावर बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -