घरताज्या घडामोडी'सुशांतचा आत्मा ओरडतोय सीबीआय चौकशी करा' सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल!

‘सुशांतचा आत्मा ओरडतोय सीबीआय चौकशी करा’ सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येवर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही आत्महत्या आहे की एखादं षडयंत्र आहे याचा शोध घेण्यासाठी सुशांतच्या कुटूंबापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकांची चौकशी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. सुशांतच्या वडीलांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या दरम्यान सुशांतच्या वडिलांच्या नावावर काही बनावट ट्विट प्रचंड व्हायरल होत आहेत. या ट्वीटमध्ये असा दावा केला जात आहे की ‘सुशांतचा आत्मा ओरडत आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी’ करत आहे.

- Advertisement -

सुशांतचे वडील के.के. सिंह यांच्या नावावर असलेल्या या बनावट ट्विटर हँडल्समुळे ३ जुलै आणि ४ जुलैला चार ट्विट करण्यात आले. ३ जुलैला संध्याकाळी ६.१६ वाजता प्रथम बनावट ट्विट आले, “सलमान खानचा पुढचा चित्रपट “कभी ईद कभी दिवाली” येत आहे,  आपण यावर बहिष्कार घालणार का ? होय की नाही?  यानंतर रात्री १०.२७ ला आणखी एक बनावट ट्विट करण्यात आले, ‘मी करण जोहर आणि आलिया भट्ट, सोनम कपूर, अनन्या, सोनाक्षी आणि बरीच नेपोटीझम विरोधात प्रचार करणार आहे, तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात काय?

यानंतर ४ जुलैला सकाळी १०.१६ वाजता त्याच ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले. त्यात लिहिले आहे की, ‘आज माझा मुलगा सुशांतचा आत्मा रडत आहे. आणि सीबीआय चौकशीची मागणी करत आहे.  यानंतर ४ जुलैला रात्री ९.३० वाजता त्याच ट्विटर हँडलवरून चौथे ट्विट केले गेले. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘सुशांतच्या मृत्यूची लवकरच सीबीआय चौकशी व्हावी यासाठी मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आहे. मी उद्या काही केले तर किती लोक माझ्या बरोबर आहेत. कृपया ट्विटरला समर्थन द्या.

- Advertisement -

आश्चर्याची बाब म्हणजे या बनावट ट्विटर अकाऊंटवरील ट्विटला हजारोंनी पसंती, शेअर आणि रिट्वीट केले आहे. सुशांतच्या वडिलांच्या नावावर बनवलेल्या या बनावट ट्विटर अकाऊंटचे १० हजाराहून हून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. हे खाते २४ जूनला तयार करण्यात आले. ट्विटरद्वारे या खात्याला ब्लू टिक मार्क देखील प्राप्त झाला नाही. असे असूनही सोशल मीडियावर सत्य सांगून ही बनावट ट्वीट व्हायरल केली जात आहेत.


हे ही वाचा – ठाण्याच्या कोव्हिड सेंटर मधून रूग्ण गायब, प्रशासनाला माहितीच नाही!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -