घरमुंबईया खासगी क्लासेसच्या कॉलेजांची मान्यता झालीय रद्द

या खासगी क्लासेसच्या कॉलेजांची मान्यता झालीय रद्द

Subscribe

मान्यतेअभावी यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षे धोक्यात आणणार्‍या आठ खासगी क्लासेसची ज्युनियर कॉलेजांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली. विद्यार्थ्यांना दुसर्‍या कॉलेजांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

मान्यतेअभावी यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षे धोक्यात आणणार्‍या आठ खासगी क्लासेसची ज्युनियर कॉलेजांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली. त्यामुळे या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना दुसर्‍या खासगी शिकवणीला जोडलेल्या ८ ज्युनियर कॉलेजांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली असून विद्यार्थ्यांना दुसर्‍या कॉलेजांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

मुंबई तसेच एमएमआर क्षेत्रात स्वयंअर्थसाहाय्यित शिक्षणसंस्था म्हणून काही क्लासेसनी ज्युनियर कॉलेज सुरू केली होती. पायाभूत सुविधा, शिक्षकांचे प्रमाण अशा निकषांची पूर्तता करण्याच्या अटीवर कॉलेजांना परवानगी देण्यात आली. मात्र काही अटींची पूर्तता करण्यात या क्लासेसना अडचणी आल्याने गतवर्षी या कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तिढा निर्माण झाला होता. मात्र राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना अन्य कॉलेजमधून परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र त्यानंतरही या क्लासेसना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी अटी पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने मुंबई विभागातील आठ कॉलेजांची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये राव एज्युकेशन ट्रस्टची अंधेरी, खारघर, सायन या ठिकाणी असलेली कॉलेज, पेस एज्युकेशन ट्रस्टचे खारघरमधील कॉलेज, लक्ष्यचे बोरिवली आणि ठाण्यामधील कॉलेजांचा समावेश आहे. या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना दुसर्‍या कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

- Advertisement -

ज्युनियर कॉलेजांच्या व्यवस्थापनाकडून त्रुटी पुर्ततेसंदर्भात नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. या व्यवस्थापनांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे मान्यता रद्द केल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम,२०१२ च्या कलम १४ (१) (क) मधील तरतुदीनुसार तसेच शासन मान्यता आदेशातील परिच्छेद २.२(१)मधील तरतुदीनुसार वरील नमूद व्यवस्थापनाच्या आठ शाळांची मान्यता याद्वारे रद्द करण्यात केल्या असून यासंदर्भातील कार्यवाही विभागीय शिक्षण उपसंचालक करुन शासनास अहवाल सादर करावयाचा आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -