ही व्यक्तीरेखा साकारणं आव्हानच- जुई गडकरी

अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या निरागसतेने आणि तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. लवकरच जुई झी युवावरील वर्तुळ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ती मीनाक्षी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. 19 नोव्हेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mumbai
Jui Gadkari
जुई गडकरी

1. वर्तुळ ही मालिका का निवडावीशी वाटली?

– वर्तुळ मालिकेचं कथानक खूपच रंजक आहे आणि म्हणून ही मालिका करण्यासाठी मी लगेच होकार दिला. मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं कारण या माध्यमाचा पसारा खूप मोठा आहे. तसेच या माध्यमामुळे मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना भेटू शकते.

2. काय कथानक आहे ?

– मी नेहमीच माझ्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात आणि मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानात्मक आहे. कारण या व्यक्तिरेखेच्या विविध छटा आहेत. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, म्हणूनच मी ही व्यक्तिरेखा स्वीकारली आणि ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.

3. तू मीनाक्षी या भूमिकेला खर्‍या आयुष्यात किती रिलेट करू शकते?
मीनाक्षीचे काही पैलू हे आपल्या सर्वांमध्ये असतील असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये सहनशीलता, संयम आणि करुणा असते. मीनाक्षी ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे. जी मी खर्‍या आयुष्यात आहे. त्यामुळे मी मीनाक्षीच्या काही पैलूंशी मी रिलेट करू शकते.

4. आम्हाला मालिकेबद्दल थोडक्यात काय सांगशील?
– या मालिकेचं कथानक टिपिकल सासू सून भांडण आणि फॅमिली ड्रामा असलेलं नाही आहे. ही मालिका रहस्यमय आहे. या मालिकेत थोडा ड्रामा तसंच वास्तविकता देखील आहे. आपण नेहमी म्हणतो कि आपण आयुष्यात पुढे जात असताना भूतकाळ मागे ठेवतो. पण खरं तर हे आहे कि भूतकाळ आपल्याला कधीच सोडत नाही आणि वर्तुळ ही मालिका वर्तमानकाळात डोकावणार्‍या भूतकाळाची आहे.

5. प्रेक्षकांकडून कशा प्रतिक्रीया मिळतात ?
– हो, प्रोमोज आऊट झाल्यावर माझा इनबॉक्स मेसेजेसने भरलेला होता. माझे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट बघत होते. पाहत आहेत आणि त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. मला बर्‍याच जणांनी असं विचारलं कि हा हॉरर शो आहे का? त्यामुळे मला सगळ्यांना हे सांगायचंय कि ही एक रहस्यमय कथा आहे.

– संचिता ठोसर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here