‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ प्रदर्शनाच्या काही तासातच लीक

दिवाळीच्या मुहूर्तावर यशराज बॅनरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट धुमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही तासही उलटत नाही तोच तो ऑनलाइन लीक झाला.

Mumbai
Thugs of Hindostan trailer launch LIVE updates
Thugs of Hindostan

दिवाळीच्या मुहूर्तावर यशराज बॅनरचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही तासही उलटत नाही तोच तो ऑनलाइन लीक झाला. ‘तमिलरॉकर्स’ या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईटवरून तो लीक झाला. विशेष म्हणजे तीन भाषांमधून HD क्वालिटीचा हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. काही चाहत्यांनी तमिल फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलमध्ये तक्रार करून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

काला चित्रपटही झाला होता लीक

यापूर्वीही या वेबसाईटवरून अनेक चित्रपट लीक झाले आहे. म्हणूनच या वेबसाईटवर योग्य ती आणि कठोर कारवाई करावी, असं मत अनेकांनी मांडलं आहे. ‘तमिलरॉकर्स’ या वेबसाईटवरून यापूर्वी काही चित्रपट लीक झाले होते. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपटदेखील याच वेबसाईटवरून लीक झाला होता. तेव्हा देखील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबधीत साईटवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

वाचा : बॉलिवूडच्या ठग्सवर ‘मीम्स’चा पाऊस

बॉलीवूडला पायरसीचे ग्रहण

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तसेच प्रदर्शित झाल्यानंतर ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही उडता पंजाब, मांझी आणि ग्रेट गॅंड मस्ता हे चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच लीक झाल्याची उदाहरणं आहेत. आता आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बिग बजेट चित्रपटदेखील या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून नापसंती मिळताना दिसून येत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अजिबातच आवडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सगळ्यांनीच चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here