दिशा पटानीला टायगरने दिल्या खास शुभेच्छा!

टायगरने दिशाला दिलेल्या या शुभेच्छा खूप खास आहेत. कारण या दोघांना एकत्र डान्स करताना बघणं चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Mumbai

अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवसादिवशी प्रत्येकजण तीला शुभेच्छा देत आहेत. पण दिशाचा खास फ्रेंड अभिनेता टायगर श्रॉफने खास अंदाजात दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. टायगरने दिशाला शुभेच्छा देताना एक व्हीडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात टायगर आणि दिशा डान्स प्रॅक्टीस करताना दिसत आहेत.

दिशाने ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या आधी एका चॉकलेटच्या जाहीरातीत दिशा दिसली होती. चित्रपटानंतर दिशा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. बागी २ चित्बॉरपटानंतर बॉलिवूडमध्ये दिशा आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं. हे दोघे अनेकदा डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळेच टायगरने दिशाला दिलेल्या या शुभेच्छा खूप खास आहेत. कारण या दोघांना एकत्र डान्स करताना बघणं चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

सध्या दिशा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यातील मैत्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आहे. आज आदित्य ठाकरे यांचाही वाढदिवस आहे. दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे. दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here