‘उल्लू’ अ‍ॅपचे दोन नवीन शो

Mumbai
Ullu App

विभू अग्रवाल उद्योगपती म्हणून जसे परिचयाचे आहेत तसेच ते निर्माते म्हणूनही चित्रपटसृष्टीला माहीत आहेत. सध्या अ‍ॅपवरून दाखवल्या जाणार्‍या कार्यक्रमांचे प्रेक्षकांना आकर्षण आहे. सहज मनोरंजन उपलब्ध म्हणून अ‍ॅपकडे पाहिले जाते. याचाच फायदा घेऊन अ‍ॅपची अनेकांनी निर्मिती करून अनेक कलाकृती दाखवणे सुरू केलेले आहे. ‘उल्लू अ‍ॅप’ हा अग्रवाल यांचा एक उद्योग आहे. त्यात त्यांनी शॉर्ट फिल्म्स् व वेबसिरिज दाखवणे सुरू केलेले आहे. आणि आता ‘डान्स बार’ आणि ‘इन्स्पिरेशन’ या दोन नव्या शोंची निर्मिती त्यांनी केलेली आहे.

दीपक पांडे यांनी ‘डान्स बार’ या वेबसिरिजचे दिग्दर्शन केलेले आहे. सुधांशू पांडे, पुनम राजपूत, नियती शहा, कनिष्का मल्होत्रा यांचा या सीरिजमध्ये कलाकार म्हणून सहभाग आहे. ‘इन्स्पिरेशन’ या शॉर्टफिल्मचे लेखन-दिग्दर्शन अतुल भल्ला याने केलेले आहे. तनुश्री दत्ता, तरणजीत कौर, इशानी शर्मा यांच्याबरोबर स्वत: अतुलनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. छोटेखानी कार्यक्रमात ‘डान्स बार’ या वेबसिरिजचे आणि ‘इन्स्पिरेशन’ या शॉर्टफिल्मचे टीझर लाँच नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here