पाहा; URI चित्रपटाचा दमदार Trailer

Mumbai
URI official trailer

अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेल्या विकीचा ‘उरी…दि सर्जिकल स्ट्राइक’ (URI) या चित्रपटातची काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. नुकताच URI चित्रपटाचा चित्रपटाचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर सध्या तो झपाट्याने व्हायरल होत आहे. २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकमधील भारतीय लष्कराची शौर्य गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. टिझर पाहिल्यानंतर लोकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती. देशभरातील प्रेक्षक आणि विशेषत: विकी कौशलचे चाहते ‘उरी’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता त्यांची प्रतिक्षा संपली असून URI Trailer चीच सध्या सर्वत्र हवा आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर सर्वप्रथम ट्विटरवर शेअर केला. या चित्रपटात विक्की कौशल आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्य घटनेवर आधारित आहे. किर्ती कुलहरी आणि परेश रावल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘उरी…दि सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाची निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली असून, चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. भारतीय लष्कराने २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे.  हा चित्रपट पुढील वर्षात ११ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘उरी’मध्ये विकी कौशल एका भारतीय कमांडोची भूमिका साकारत आहे. अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. संजू, राझी आणि मनमर्झिया सारख्या तीन वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून विकीने तितकाच दमदार आणि वैविध्यपूर्ण अभिनय साकारला आहे.


पाहा Video : विकीने असं केलं ‘URI’ चित्रपटाचं डबिंग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here