घरमनोरंजनया लोकप्रिय मालिकेच्या वेळत बदल;आता दिसणार 'या' वेळेत!

या लोकप्रिय मालिकेच्या वेळत बदल;आता दिसणार ‘या’ वेळेत!

Subscribe

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झाली. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार रोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी ही मालिका बंद होणार अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. ही मालिका निरोप घेत नाहीये तर या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे.

- Advertisement -

ही मालिका २१ ऑक्टोबरपासून संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे, तर संध्याकाळी ७.३० वाजता ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

- Advertisement -

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झाली. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकेत येणारे अनेक चढउतारही पाहिले असल्याने मालिका इतक्यात तरी बंद करणार नाही, फक्त मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल होणार आहे असे वाहिनीने स्पष्ट केले. ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ ही नवी मालिका नेमके काय घेऊन येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ‘झी मराठी’वर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ही नवीन मालिका २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तसंच होम मिनिस्टर हा कार्यक्रम रोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -