शाहरुख-सलमानचं ‘इश्कबाजी’ गाणं लाँच!

शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटातील 'इश्कबाजी...' हे गाणं आज प्रदर्शित झालं असून यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकसाथ थिरकताना दिसत आहेत.

Mumbai
salman and shahrukh khan
सलमान खान आणि शाहरुख खान

बॉलीवूडचे करण-अर्जुन म्हणजेच सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यावेळी बुटका शाहरुख स्टार सलमानसोबत थिरकताना पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटातील ‘इश्कबाजी…’ हे गाणं आज प्रदर्शित झालं असून यामध्ये दोघही एकसाथ थिरकताना दिसत आहेत. त्यामुळे बॉलीवूडमधील दबंग आणि किंग खान यांच्या चाहत्यांसाठी ही मेजवानी ठरणार आहे.

वाचा : ‘झिरो’मधील पहिलं गाणं; ‘मेरे नाम तू…’ रिलीज!

 

वाचा : ‘झिरो’ चित्रपटाच्या याचिकेवर आता ३० तारखेला सुनावणी

गणेश – रेमोही गाण्यावर थिरकले 

गाण्याची सुरुवात कतरिना कैफ आणि शाहरुख खानच्या सीनने होते. तर डान्सची सुरुवात दोन दिग्गज नृत्य दिग्दर्शकांच्या नृत्याने होते. गणेश आचार्य आणि रेमो डिसुजा यांच्यासोबत शाहरुख खान या गाण्यावर नृत्य सादर करतो. तर सलमान खान त्यांना नंतर सामील होतो. यापूर्वीही या दोन सुपरस्टार्सना आपण करण-अर्जुन, कुछ कुछ होता है सारख्या चित्रपटांमधून एकत्र काम केलं आहे.

वाचा : शाहरुखचं चाहत्यांना रिटर्न बर्थडे गिफ्ट; ‘झिरो’चा ट्रेलर लाँच!