घरफिचर्समहाराष्ट्रातील लढवय्या नेता : कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड !

महाराष्ट्रातील लढवय्या नेता : कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड !

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लढवय्या, अष्टपैलू आणि धुरंधर नेता म्हणजे आमचे आधारस्थान, मार्गदर्शक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड होय. राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा क्षेत्राचा प्रचंड अभ्यास असलेला आणि सर्वोच्च वैचारिक पातळी असलेला प्रगल्भ नेता अर्थात जितेंद्र आव्हाड होय. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा, विचारांचे रक्षण करणारा खर्‍या अर्थाने लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा रक्षक म्हणजे जितेंद्र आव्हाड होय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नागपूर येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात सर्व आमदारांना संविधानाची शपथ घेण्याची परंपरा सुरु करण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या संविधानिक वैचारिकतेची प्रगल्भता दिसून येते.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा जितेंद्र आव्हाड यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे. त्यांचे खंबीर नेतृत्व, आक्रमक व्यक्तिमत्व सामान्य कार्यकर्त्याच्या मनात नवा उत्साह आणि विश्वास निर्माण करून जातो. बहुजन समाजाच्या न्याय-हक्कासाठी त्यांची लढाई कायम सुरू असते. म्हणूनच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय-हक्काच्या लढाईत त्यांचे स्थान अग्रणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खास विश्वासू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सच्चा नेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे स्थान आहे. भाजपच्या काळात महाराष्ट्रात आलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये शरद पवार यांच्याबरोबर खंबीरपणे राहून राष्ट्रवादीच्या उभारणीसाठी जितेंद्र आव्हाड यांनी दाखवलेली निष्ठा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी आहे.

- Advertisement -

विजय नेहमी सत्याचा होतो, हा प्रकृतीचा नियम आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यात यश आले. महाविकास आघाडीचा करिष्मा चालला आणि किंगमेकर ठरले शरद पवार. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड कॅबिनेट मंत्री झाले, हे त्यांच्या कार्याचे गमक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून काम करत असताना आमचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकडे आमचे विशेष लक्ष असते. जितेंद्र आव्हाड यांच्या सारखे पितृतुल्य मार्गदर्शक आम्हाला लाभले. म्हणूनच इथला सामाजिक आणि राजकीय गाढा हाकताना मार्गक्रमण सहज होऊन जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आम्हाला स्फूर्ती मिळते. महाराष्ट्राच्या अशा खंबीर नेतृत्वाला वाढदिवसानिमित्ताने लक्ष-लक्ष शुभेच्छा !

– मल्लिकार्जुन पुजारी

- Advertisement -

( या लेखाचे लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -