घरफिचर्सन्यूजमेकर

न्यूजमेकर

Subscribe

पत्रकार-संपादक, प्रवक्ता, निकटवर्तीय अशा अनेक भूमिका आपल्या छातीवर ताण आणत निभावणार्‍या त्या लढवय्याने आपली जबाबदारी लीलया निभावली आणि फडणवीस ते शाह-मोदींचे हृदयाचे ठोके चुकवले. सतत महिनाभर माध्यमांना बातम्यांचा रतीब घालण्याची व्यवस्था केली त्या माणसाने आपली न्यूजमेकर ही ओळख सार्थ ठरवली त्या अभिनयसम्राटचे नाव आहे संजय राऊत. काही वेळा बातम्यांचे बुमरँग उलटले की काय असे वाटताना राऊतांनी बाजी पालटवली.

राऊतांचे बाईट बघताना अनेकांच्या अंगाचा तीळ पापड होत होता. शेवटी २३ तारखेला चंद्रकांत पाटलांनी जाहीरपणे सांगून टाकले, अरे बाबा गप्प बस रे… तू शिवसेनेची वाट लावलीस…! तरी राऊत काही थांबले नाही ते बोलत राहिले, लिहीत राहिले आणि माहोल बनवत राहिले.

- Advertisement -

शरद पवारांचा कोणालाच अंदाज येत नव्हता, पण राऊत या सत्तेच्या महादेवावर अभिषेक करतच राहिले. पवारांकडून सत्तेसाठी मुख्यमंत्री म्हणून राऊतांचे नाव सुद्धा छान पेरले गेले, पण राऊत हुरळले नाहीत. त्यांनी आपला फोकस फक्त बातमीत राहण्यावर ठेवला. हा फोकस इतका नीट होता की राष्ट्रीय चॅनेल राऊतांसाठी भांडुपसारख्या उपनगरापर्यंत जायला तयार झाले.

राऊतांच्या रोजच्या बोलण्याचा सेनेच्या नेत्यांचे कानही किटले होते, पण हार मानतील ते राऊत कसले? २४ तारखेला महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेचे नाव घोषित केले आणि राऊतांनी उद्धव ठाकरेंना मिठी मारली. त्यादिवशी अनेकांना सत्तेच्या सिंहासनावर बसवणार्‍या ठाकरेंनी सत्तेची खुर्ची खर्‍या अर्थाने स्वीकारली आणि ही एक नॅशनल न्यूज ठरली. आणि आता एका किंगमेकरला घेऊन घडवणारा खराखुरा ‘न्यूजमकेर’ नव्या
सामन्यासाठी सज्ज झालाय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -