‘इसिस’चा ऑक्टोपस!

Mumbai
इसिस

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबाद आणि मुंब्रा येथून नुकतीच अटक केलेल्या ११ तरुणांनी उम्मद-ए-मोहम्मदिया या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून राज्यात रासायनिक हल्ल्याची मोठी योजना आखली होती, मात्र वेळीच कारवाई करून हा रासायनिक हल्ला महाराष्ट्र एटीएसने उधळून लावला. रासायनिक हल्ला करण्याचा कट इसिसने काही मोजक्या तरुणांना हाताशी धरून आखला होता, मात्र एटीएसने तो उधळून लावला ही बाब आपण तेवढी गांभीर्याने घेतलेली नाही. या रासायनिक हल्ल्याचा परिणाम काही देश अजूनही भोगत आहेत.

२०१७ मध्ये सीरियातील डोमा शहरावर रासायनिक हल्ला करण्यात आला होता. या रासायनिक हल्ल्यात ८० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. भारतात या प्रकारचा रासायनिक हल्ला करण्याची मोठी योजना इस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेकडून आखली तर जात नाही ना ? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने( एटीएस) औरंगाबाद आणि मुंब्रा येथून नुकतीच अटक केलेल्या अकरा संशयित तरुणांची जिहादच्या नावाखाली माथी भडकावून त्यांच्यामार्फत रासायनिक हल्ल्याचे करण्याची योजना आखली तर नाही ना? नुकत्याच केलेल्या कारवाईमुळे अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अन्न आणि पाण्यातून ‘रासायनिक हल्ला’ करून मोठा नरसंहार घडवून देशात हाहा:कार माजवण्याच्या इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांचा हा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) उधळून लावला. इस्लामिक स्टेटच्या संघटनेच्या संपर्कात आलेल्या या ११ तरुणांना औरंगाबाद आणि मुंब्रा येथून एटीएसच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हायड्रोजन पॅरॉक्साइड, असिटोन ही रासायनिक द्रव्ये, विषारी पावडर आणि मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या या संशयितांनी देशात रासायनिक हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यांच्या लक्ष्यावर शहरातील जलकुंभे, जलाशय आणि शहरात होणारे मोठमोठे इव्हेंट होते, अशी माहिती खुद्द एटीएसने पत्रकारांना दिली. अटक करण्यात आलेल्या या तरुणांमध्ये काहीजण केमिकल इंजिनीयर तर काही जण फार्मासिस्ट, तर काही सायबर एक्सपर्ट आहेत. या हल्ल्याचे प्रात्यक्षिकदेखील या तरुणांनी औरंगाबाद येथे केले असल्याचे एटीएसच्या तपासत समोर आले आहे.

सिरिया आणि इराक या देशात धुमाकूळ घालणार्‍या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅड सिरिया अर्थात ‘इसिस’ ही संघटना कधीकाळी ‘अल कायदा’ या नावाने ओळखली जात होती. मात्र २००६ साली अमेरिकेने अल कायदा या संघटनेला संपवल्याचा दावा केला असला तरी ती पूर्णपणे संपलेली नव्हती. २०११ मध्ये इसिसच्या नावाने या संघटनेने आपले डोके वर काढले.

जिहादी विचारांच्या इसिस या दहशतवादी संघटनेने समाज माध्यमाचा आधार घेत जगभरात आपले जाळे पसरवण्यास सुरुवात केली. इसिस ही संघटना धर्माच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणांची माथी भडकावून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढणार्‍या या संघटनेचे नेते सिरिया आणि इराकमध्ये बसून येथील तरुणांची जिहादच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावून या तरुणांकडून देशात घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. उघडपणे कारवाया करू न शकणार्‍या इसिसचे गट वेगवेगळ्या नावाने हल्ले घडवून आणत आहेत.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद आणि मुंब्रा येथून नुकतीच अटक केलेल्या ११ तरुणांनी उम्मद-ए-मोहम्मदिया या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून राज्यात रासायनिक हल्ल्याची मोठी योजना आखली होती, मात्र वेळीच कारवाई करून हा रासायनिक हल्ला महाराष्ट्र एटीएसने उधळून लावला.

रासायनिक हल्ला करण्याचा कट इसिसने काही मोजक्या तरुणांना हाताशी धरून आखला होता, मात्र एटीएसने तो उधळून लावला ही बाब आपण तेवढी गांभीर्याने घेतलेली नाही. मात्र या रासायनिक हल्ल्याचा परिणाम काही देश अजूनही भोगत आहेत.

हनीट्रॅप जाळे
भारतात सर्वत्र इंटरनेटचे जाळे पसरले आहे. इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाज माध्यमांनी भारतीयांवर कब्जा केला आहे. त्यात तरुणपिढी अधिकच वाहत चालली आहे, या समाज माध्यमाच्या फायदा देशाच्या बाहेर असलेल्या दहशतवादी संघटना घेत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या संघटना तरुणींचा वापर करीत आहेत. या तरुणी तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा ब्रेनवॉश करीत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांची जिहादच्या नावाखाली माथी भडकावली जात आहेत. त्यांना आपल्या देशात बोलवून त्यांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेतले जाते, त्यानंतर त्यांना बॉम्ब तयार करणे, घातपात घडवून आणले या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, धर्माच्या नावाखाली या तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी तयार करून पुन्हा त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवून त्यांच्यामार्फत देशात हल्ले घडवून आणले जातात.

रासायनिक हल्ला म्हणजे काय ?

२०१७ मध्ये सीरियातील डोमा शहरात रासायनिक हल्ला झाला होता. हेलिकॉप्टरमधून शहरात बॅरल बॉम्ब सोडण्यात आले होते. यामध्ये ८० जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता, तर अनेकांना त्याचा त्रास झाला होता. रासायनिक हल्ल्यात वापरण्यात आलेले रसायन कोणतं होतं? ते किती विषारी असतं? ही रासायनिक शस्र बनवण्यासाठी सीरियाला मदत कोण करतं? सीरियातील अनेक नागरिकांवर केलेल्या क्रूर रासायनिक हल्ल्यांची जबाबदारी रशियाला घ्यावी लागेल, असं अमेरिकेचं म्हणणं होतं, मात्र सीरिया सरकारने हे खोटं असल्याचं म्हटलं होतं.

सिरियातील डोमा शहरावर झालेल्या रासायनिक हल्ल्यासाठी ‘सेरेन’ या रसायनाचा वापर करण्यात आला होता. सेरेन हे रसायन नर्व्ह एजंट म्हणून काम करते. नर्व्ह एजंट प्रकारातील रसायनांचा परिणाम थेट मज्जासंस्थेवर होतो.

रासायनिक हल्ल्याचा परिणाम झालेल्या लोकांना फीट येणे, तोंडातून फेस येणे अशी लक्षणं असतात, ही लक्षणं नर्व्ह एजंट आणि क्लोरिन गॅसच्या संपर्कात आल्याने दिसून येतात.

सेरेन काय आहे?
सेरेन हे अत्यंत घातक रसायन असल्याचे सांगितले जाते. सायनाईडपेक्षा कित्येक पटीने अधिक विषारी असणारं हे रसायन आहे. सेरेन या रसायनाचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. काही सिग्नल्स थांबवून त्यातील पेशी नष्ट होतात. त्यातून हृदय आणि श्वसनसंस्थेतील स्नायू जखडले जातात. हे रसायन पुरेशा प्रमाणात संपर्कात आलं तर काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो.

विषारी रासायनिक हल्ले
महाराष्ट्र एटीएसने नुकतीच अटक केलेल्या संशयिताकडून विषारी रसायनांचा वापर करून अन्न आणि पाण्यातून रासायनिक हल्ला करण्याचा कट आखला होता हे स्पष्ट झाले आहे.

१९१५ बेल्जियम देशातील “लेपर” ह्या शहरात “फोस्जीन” आणि “सल्फर मस्टर्ड” या विषारी रसायनाचा वापर करून रासायनिक हल्ला करण्यात आला होता, त्यात मोठ्या संख्येने प्राणहानी झाली होती.

१९८० मध्ये इराकने इराणवर “सल्फर मस्टर्ड” ने रासायनिक हल्ला घडवून आणला. पूर्वी याप्रकारचे अनेक रासायनिक हल्ले झालेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक विषारी पदार्थांचा वापर करण्यात आला आहे.

विज्ञानात जेवढी प्रगती होताना दिसून येते तेवढा त्याचा गैरवापरसुद्धा दिसून येत आहे. अनेक वेळा रासायनिक युद्धावर बंदी आणूनसुद्धा सिरीयासारखा देश त्याचा गैरवापर करीत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.

रासायनिक विषारी पदार्थांचे परिणाम
विसाव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणात वेगवेगळी विषारी रसायने वापरण्यात आली आहेत. अनेक लोकांना अशा विविध प्रकारच्या रसायनांचा गंधही नसेल अशी ही रसायने आहेत.

विषारी रासायनिक हल्ल्याचा घातक परिणाम मनुष्यासह अनेक सजीवांवरदेखील होतो. ज्यावर मोठ्या प्रमाणात लवकर औषधे उपलब्ध होत नाहीत. ज्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो तिथून शुद्ध हवेच्या ठिकाणी पलायन करणे, पाण्याने संपूर्ण अंग धुवून काढणे, रसायनांच्या संपर्कात आलेले अंगावरील कपडे काढणे आणि रूग्णालय गाठणे हेच महत्त्वाचे ठरते.

-संतोष वाघ