घरफिचर्समाझ्या अस्तित्वाची सुरुवात

माझ्या अस्तित्वाची सुरुवात

Subscribe

‘छेडछाड क्यों ?’ या नाटकाने माझ्यात स्वतःकडे पाहण्याचा, समाजातील घटनांकडे, परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन निर्माण केला. तो दृष्टीकोन होता आधी स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे एक अभिमान म्हणून पाहण्याचा. माझं स्त्रीत्व एक नैसर्गिक प्राकृतिक देणगी आहे. स्वतःचा स्त्री म्हणून द्वेष करणे मी या नाटकानंतर बंद केलं.

मैं आदि और अंत हूँ

-मंजुल भारद्वाज

- Advertisement -

दो नितम्ब

एक गर्भाशय

- Advertisement -

एक योनि

मात्र नहीं हूँ मैं

मैं विश्व का

विधान, संविधान हूँ

मैं सृष्टि हूँ

प्रकृति हूँ

मैं ब्रह्म हूँ

जन्म,वजूद

हैसियत,अस्तित्व

व्यक्ति,व्यक्तित्व

जीवन और मृत्यू

मुझसे हैं

मेरी प्रतिशोध प्रतिज्ञा में

सभ्यताएं नष्ट हो जाती हैं

मेरे प्रण से धरती फट जाती हैं

मैं रस्मो रिवाज का ठीहा नहीं हूँ

सिंदूर पोतने और मंगल सूत्र

चढ़ाने वाला पत्थर नहीं हूँ

मैं आग हूँ

मेरा अंश ही हैं वंश

अपने रक्त,मेरु,मज्जा से

अपने ही ममत्व में भीगती हुई

दुनिया को रचती हूँ

मैं आदि और अंत हूँ!

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांची स्त्रीशक्तीवरील काव्यरचना नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. जागतिक महिला दिन आठवण आहे स्त्रीच्या हक्काच्या लढ्याची. आजही भारतात स्त्रियांचा लढा त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी सुरूच आहे. हा लढा आहे आई, बहीण, मुलगी, पत्नी या नात्यांपलीकडे स्वतःची ओळख निर्माण करण्याचा. आपले अस्तित्व घडवण्याचा. हा लढा आहे तिच्यातील स्वत्वाचा.

माझं नाटक ‘छेडछाड क्यों’ याने मी माझ्या थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्यप्रवासाची सुरुवात केली, सुरुवातीला एक कलाकार या दृष्टीने मी या नाट्यप्रक्रियेत घडत गेले, स्त्री म्हणून माझ्या असण्याचे परिवेष छेदले आणि माझ्या अस्तित्वाचे परीघ निर्माण केले…मी माणूस म्हणून जगण्याची सुरुवात केली ती याच नाटकाने…

एक कलाकार व एक माणूस हा समन्वय साधत मी व्यक्ती म्हणून घडले. आज मागे वळून पाहताना अभिमान वाटतो, आनंद वाटतो की, या सहा वर्षात मी स्वतःला निर्माण केले आणि आज मी माझ्यासारखे युवा घडवत आहे, त्यांना उन्मुक्त जीवन जगण्याचा आनंद व दिशा मिळावी यासाठी माझ्या नाट्यकलेने रंगदृष्टी निर्माण करत आहे.

आज मी तुम्हाला एक नव्या नाट्य विश्वात घेऊन जाणार आहे. एक असे विश्व ज्याने प्रत्येकाला माणूस म्हणून पाहिलं आणि माणूस म्हणून घडवलं. स्वप्नवत वाटतंय ना, पण हे खरं आहे. मी भेटले अशा विश्वातल्या या स्वप्नवेड्याला, रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांना. त्यांची माझी पहिली भेट अनोखी आणि अनमोल आहे, त्यांच्या ’छेडछाड क्यों ?’ या नाटकाविषयी मला अश्विनी नांदेडकर हिने सांगितले आणि म्हणाली की, सायली ये इथे भन्नाट नाट्यप्रक्रिया होत आहे. हे ऐकूनच मनात कुतूहल निर्माण झाले आणि मी ‘छेडछाड क्यों?’ या नाटकाच्या तालमीला पोहचले.

नाटकाची तालीम ही नेहमीच्या तालमीसारखी नव्हती, इथे काहीतरी वेगळं घडतंय हे जाणवत होतं. स्क्रिप्ट वाचन किंवा स्टेजवर उभं राहण्याआधी इथे मेंदूची मशागत होत होती. छेडछाड(Eve teasing) विषय खूप प्रभावात्मक होता. या प्रक्रियेत सुरुवातीला मी आले तेव्हा छेडछाडीच्या प्रकारामुळे समाजात आपल्या आसपास एवढे गंभीर प्रकार घडतात, एवढी बिकट परिस्थिती आहे हे तेव्हा समजले.

तालीम करत असताना script वर discussion व्हायचं त्यामुळे हा विषय किती गंभीर आहे हे जाणवलं. त्याचा प्रभाव इतका व्हायचा की, आपसूकच रडू यायचं कारण आशय इतका वास्तवदर्शी होता की, असे छेडछाडीचे प्रकार माझ्याही बाबतीत घडले होते, पण मी कधीच उघडपणे यावर बोलले नाही. हे सर्व ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती माझ्यात होती. माझ्याबरोबरही अशा घटना झाल्या, त्यांना मी डोळसपणे दुर्लक्षित केले.

त्यामागे कारणही असे होते की, छेडछाडीविरुद्ध नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. कारण आतापर्यंत मुलींच्या जडणघडणीत समाजाने हेच बिंबवलेले असते की, तिची कोणी छेड काढली म्हणजे तिचीच चूक असणार, मग याच न्यूनगंडामध्ये प्रत्येक महिला – मुलगी स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करायला लागते.

प्रत्येक स्त्रीचा संघर्ष असतो तिला तिच्या शरीरापलीकडे एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून पहावे, हा संघर्ष मीही करत होते सुरुवातीला. या नाट्य प्रक्रियेत मंजुल सर जाणून-बुजून माझ्याकडे रोखून पाहत होते, थोड्यावेळाने त्या रोखून पाहणार्‍या नजरेचा मला त्रास व्हायला लागला, मी त्या क्षणासाठी खूप uncomfortable झाले. तेव्हा त्यावर सर म्हणाले की, कोणी तुझ्याकडे रोखून पाहत आहे, ह्यात तुझी चूक नाही. ही त्या पाहणार्‍याची चूक आहे. त्याच्या मानसिकतेची आहे आणि या मानसिकता जशा मला कळत गेल्या तसं माझं माणूस म्हणून जगणं सुसह्य होत गेलं.

‘छेडछाड क्यों ?’ या नाटकाने माझ्यात स्वतःकडे पाहण्याचा, समाजातील या घटनांकडे, परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन निर्माण केला. तो दृष्टीकोन होता आधी स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे एक अभिमान म्हणून पाहण्याचा. माझं स्त्रीत्व एक नैसर्गिक प्राकृतिक देणगी आहे. स्वतःचा स्त्री म्हणून द्वेष करणे मी या नाटकानंतर बंद केलं. माणूस म्हणून जन्माला येणं आणि माणूस म्हणून जन्मभर जगणं यात अंतर आहे. माणूस म्हणजे संवेदना, सहवेदना, समभाव आणि समानतेने जगण्याची भावना.. ही भावना तेव्हाच टिकते जेव्हा वैचारिक परिपक्वता स्वभावाची जमीन पकडते. स्वभाव आपल्या विचारांची चेतना दर्शवतो..

विचारात पोकळी आली की vaccum निर्माण होतो आणि त्यात प्रथम जागा बजावली जाते ती श्रेष्ठत्वाची. मग माणूस माणसात फरक करायला लागतो.. मी श्रेष्ठ तू बिचारा.. मी श्रीमंत तू गरीब.. मी ताकदवान तू कमजोर.. त्याचाच एक प्रकार म्हणजे – छेडछाड … ज्यात एक मानसिकरित्या विकृत आणि एक मानसिकरित्या कमजोर असतो..

छेडछाड फक्त लैंगिक अत्याचार नाही, शारीरिक दुर्घटना नाही तर खूप सूक्ष्म पण भयंकर मानसिकता आहे, जी माणसात विकृतीला जन्म देते. ही विकृती वर्चस्ववाद निर्माण करते जिथे आपल्या विकृत ताकदीने कोणाला ही कंट्रोल करता येऊ शकतं.. म्हणजेच सध्याची सामाजिक व्यवस्था – “पितृसत्ता”.. या मानसिकतेचे निदान आणि त्यावर समाधान शोधते नाटक “छेडछाड क्यों? ” रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक समाजाच्या मेंदूवर कडाडून प्रहार करते.
आपल्यासोबत, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात आपण रोज अशी अनेक उदाहरणे पाहतो ,अनुभवतो… आता तर अर्धी लोकसंख्या (महिला) घराबाहेर पडते, जॉब करतात, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण किती जणी घरातही तेवढ्याच स्वावलंबी आहेत? स्वतःच्या अस्तित्वाच्या जोरावर उभ्या आहेत? की आजही जॉबवरून घरी गेल्यावर 9 च्या काट्यावर घरच्यांना ताट नेऊन द्यावं लागतं? मंजुल सरांनी या विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी गप्प राहण्याच्या प्रवृत्तीला आपल्याला खोडायचे आहे ही जाणीव आम्हा कलाकारांत निर्माण केली.

मुळात प्रश्न आहे मानसिकतेचा.. शारीरिक शोषण दिसून येते, परंतु मानसिक शोषण अधिक घातक असते.. पितृसत्ता एक मानसिक शोषण आहे जे वर्षानुवर्षं सुरू आहे.. जे महिलेला वस्तू समजते. पितृसत्ताक व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले. नाटकाच्या माध्यमातून स्त्रीचे शरीर आणि त्या शरीराबाहेर असणारे स्त्रीचे अस्तित्व याविषयी समजले. सामाजिक स्तरांवर या नाटकाने जनतेला (प्रेक्षकांना) ज्ञानात्मक व बोधात्मक मंच उपलब्ध करून दिला आणि या नाटकाला सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

नाटक हे नाटक असतं, नाटकाला प्रायोगिक, व्यावसायिक, हौशी, अशा चौकटीत पाहण्यापेक्षा त्या नाटकांतून मी काय घेतलं, माझ्यात काय बदल झाले, मला काय नवीन शिकायला मिळालं आणि त्या नाटकाने प्रेक्षकांत, समाजात काय परिवर्तन घडवून आणलं, ही प्रक्रिया मला जास्त महत्वाची वाटते.

ही दृष्टी इथे आल्यानंतर अधिक स्पष्ट होते.काल ‘छेडछाड क्यों?’ या मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकात परफॉर्म करून एक अभिनेत्री म्हणून आपण समाजातील गंभीर विषयांवर आपल्या कलेतून प्रकाश पाडत आहोत याची जाणीव झाली आणि नाटकानंतर प्रेक्षकांशी संवाद झाल्यावर लक्षात आले की, कलाकार म्हणून आपल्या कलेतून जो आरसा आपण समाजाला दर्शवतो त्याने जाणिवा, संवेदना, भावना, विचार ही चतुःसूत्री जागृत होऊन प्रेक्षकांत नवचेतना निर्माण होतेय आणि बदलाची सुरुवात या एका क्षणापासूनच होते.

माझ्या कलेचा उपयोग मी एक कलाकार म्हणून सकारात्मक दिशेने करत असल्याचा अभिमान आणि आनंद आहे.
आणि ही संधी मला थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्य प्रक्रियेत सातत्याने मिळते आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -