घरफिचर्सनिरोगी जीवनासाठी सोपे उपाय

निरोगी जीवनासाठी सोपे उपाय

Subscribe

रोजचे धकाधकीचे जीवन, बदललेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. शारीरिक तक्रारींसोबत मानसिक आरोग्यावर देखील धकाधकीच्या जीवनाचा परिणाम होत असतो. तेव्हा रोजच्या जीवनशैलीत काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश केला तर निरोगी जीवनाचा आस्वाद लुटता येईल.

  • रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे वेगवेगळ्या कारणाने ताण-तणाव आणि कधीकधी डिप्रेशनचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी रोजच्या जीवनात योगासने, प्राणायाम, ध्यान करणे, सकाळी किंवा सायंकाळी फिरणे किंवा तत्सम हलका-फुलका व्यायाम आदी गोष्टींचा समावेश करावा.
  • धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा जेवणाच्या वेळेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे पोटासंबंधीच्या तक्रारी डोके वर काढतात. त्यामुळे ठरलेल्या वेळेत जेवण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात. पचायला हलक्या पदार्थांचा जेवणात समावेश करावा. तसेच चहा, कॉफी, शीतपेय यापासून दूर रहावे. त्यामुळे आरोग्याच्या सततच्या तक्रारींपासून दूर राहता येते.
  • नियमित व्यायामाला महत्व द्यावे. व्यायामामुळे शरीर हलके व स्वस्थ होते. पण झोपण्यापूर्वी व्यायाम करु नये. त्याऐवजी सकाळच्या वेळेस योगासने, प्राणायाम केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.
  • रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करावी. तसेच झोपताना शरीर ढिले करून दीर्घश्‍वसनाचा अभ्यास करावा. तसेच सायंकाळी कोमट किंवा सामान्य पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
  • झोपण्यापूर्वी अर्धा तास गरम दुधाचे सेवन करावे. स्थूल व्यक्तींनी मात्र दुधाचे सेवन करु नये. शरीरास हलका मसाज करावा. त्याचा शरीराला खूप फायदा होतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -