जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- धंद्यात अनाठाई होणारा खर्च लक्षात येईल. तुमचा मुद्दा घरातील लोकांना पटवून देता येईल.

वृषभ :- गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मौज मजा कराल. कोर्ट केसमध्ये मदत मिळेल.

मिथुन :- बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. संगीत क्षेत्रात मन रमेल. आवडत्या विषयात मन एकाग्र होईल.

कर्क :- मनावर दडपण राहील. प्रवासात ओळख होईल. महत्त्वाची वस्तू वेळेवर जागेवर ठेवा.

सिंह :- आजचे काम उद्यावर टाकू नका. दूरच्या प्रवासात जाण्याचे ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

कन्या :- तुमच्या मेहनतीला यश मिळेल. घरातील कामे करून घेता येतील. शेजारी मैत्री करेल.

तूळ :- तुमचा उत्साह वाढेल. कल्पनाशक्ती कृतीत उतरवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्चिक :- जिद्दीने तुमच्या कामात यश खेचावे लागेल. घरातील कामे करण्याची टाळाटाळ करू नका.

धनु :- महत्त्वाची भेट घ्या. चर्चा करता येईल. प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

मकर :- प्रवासात महत्त्वाची वस्तू सांभाळा. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. फसगत टाळता येईल.

कुंभ :- आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. मोकळ्या हवेत फिरण्याचा मूड होईल. आनंदी रहाल.

मीन :- तुमच्यावर टाकलेली कामाची जबाबदारी वेळेत पूर्ण करता येईल. जुन्या आठवणीत मन रमेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here