घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Subscribe

मेष :- अहंकाराने व हट्टाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही. कुणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास वाद व तणाव होईल.

वृषभ :- प्रेमाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रभाव वाढेल. खर्चात तडजोड करावी लागेल.

- Advertisement -

मिथुन :- धंद्याचा योग्य दिशेने व्याप वाढवता येईल. प्रेमाची व्यक्ती मिळेल. खाण्यापिण्यास चमचमीत पदार्थ मिळतील.

कर्क :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. कामातून बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधल्यास गैरसमज होईल.

- Advertisement -

सिंह :- जबाबदारी झटकून चालणार नाही. सर्वाच्या मतांचा आदर केला पाहिजे हे शिकण्यास मिळेल.

कन्या :- नोकरीत दबाव वाढेल. वरिष्ठ ताठर भूमिका सोडून देतील. सहमती मिळवता येईल.

तूळ :- उपाय योजना करता आल्यामुळे प्रसंग उत्तम प्रकारे निभावून न्याल. वर्चस्व वाढेल. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक :- विचारांना गती येईल. विरोधकांचा विचार व डावपेच लक्षात येतील. योग्य निर्णय घेता येईल.

धनु :- मुलांच्या विचारांना कमी न समजता त्यावर चर्चा करा. दुसर्‍याचे मन जाणून घ्या. स्वतःच्या हट्टापाई वाद संभवतो.

मकर :- क्षमाशील वृत्ति कुणाबाबत असावी किंवा नसावी याबद्दल या तुमचा विचार ठाम व योग्य मिळेल.

कुंभ :- आपले मत पटवून देतांना योग्य विचारांचे उदाहरण देणे महत्त्वाचे असते. घाई करू नका.

मीन :- मुले आनंद निर्माण करतील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. खर्च वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -