राशीभविष्य: शुक्रवार, २७ मार्च २०२०

Mumbai

मेष – तुमच्यावर झालेल्या आरोपाला उत्तर देता येईल. अहंकाराची भाषा वापरू नका. शेजारी मदत करतील.

वृषभ – धावपळ होईल. अचानक कामात बदल करावा लागेल. मौल्यवान वस्तू नीट जागेवर ठेवा. उदास वाटेल.

मिथुन – आज ठरविलेले काम करून घ्या. तुमच्यावर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिली जाईल. महत्त्वाचा निर्णय घ्याल.

कर्क – ताणतणाव कमी झाल्याने मनावरील दडपण कमी होईल. धंद्यातील चूक सुधारता येईल. प्रतिष्ठा मिळेल.

सिंह – तुमच्या विरोधात कट केला जाईल. रागावर ताबा ठेवा. जवळचे लोक मदत करतील. स्पर्धेत सदस्य रहा.

कन्या – तुमच्या मुद्द्याचा विचार केला जाईल. तुम्ही भूमिका कठोर घेऊ नका. वाहन जपून चालवा.

तुळ – उत्साहाच्या भरात बोलताना काळजी घ्या. आवडते पदार्थ कराल. नवीन ओळखी होतील. नोकरीत नम्रपणे वागा.

वृश्चिक – शुल्लक कारणाने तुमचा मूड जाईल. बोलताना रागाच्या भरात कडवट वागू नका. प्रवासात घाई करू नका.

धनु – नोकरीत महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. वेळेवर काम पूर्ण करा. धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज नीट घ्या, नुकसान टळेल.

मकर – घरातील कामे होतील. भेट घेण्यात यश मिळेल. चर्चा सफळ होईल. धंद्यात काळास करू नका. प्रभाव पडेल.

कुंभ – नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. वसूलीचे काम करा. कोर्ट केस जिंकाल. खरेदी कराल.

मीन – तुमचे अडचणीत आलेले काम करून घ्या. ओळखी होतील. धंदा वाढेल. शेअर्समध्ये फायदा होईल. प्रतिष्ठा मिळेल.