राशीभविष्य : बुधवार, १ एप्रिल २०२०

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष : नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. धंद्यात काम मिळवताना तडजोड करावी.

वृषभ : कोटीच्या कामात यश मिळेल. अडलेली कामे करून घ्या. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. आनंदी रहाल .

मिथुन : घरातील कामासाठी खर्च करावा लागेल. प्रवासात घाई करू नका. अचानक कामात बदल होईल.

कर्क : किरकोळ कारणाने तुमचा मूड जाऊ शकतो. कामात बदल करण्याची वेळ येईल. रागावर ताबा ठेवा.

सिंह : विरोधकांना गोड बोलून समजवता येईल. अरेरावी करू नका. कठोर बोलणे टाळा. नविन ओळख होईल.

कन्या : घरातील व्यक्तीची नाराजी दूर करता येईल. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल.

तुळा : मनाची द्विधा अवस्था होईल. इतरांना दिलेला सल्ला कदाचित त्यांना आवडेल असे नाही. कमी बोला.

वृश्चिक : वादविवादाचा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. हळू बोला. खाण्यासाठी आवडते पदार्थ मिळतील. प्रतिष्ठा राहील.

धनु : घरातील समस्या सोडवता येईल. नाराजी दूर करता येईल. डोळ्यांची काळजी घ्या. पाहुण्यांचे स्वागत कराल.

मकर : विरोधकांना गप्प कराल. कला क्षेत्रात विशेष कल्पना सुचेल. क्षुल्लक अडचण येईल. राग वाढू देऊ नका.

कुंभ : महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. जमीन, घर यासंबंधी कामे करावी लागतील.

मीन : सर्वत्र तुमचा प्रभाव वाढेल. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. अधिकार मिळेल.