राशीभविष्य : बुधवार, ११ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग मिळेल. धंद्यात वाढ करा. वेळेला महत्त्व द्या. राजकीय-सामाजिक कार्य वेगाने होईल.

वृषभ : सहनशीलता ठेऊन वागल्यास कोणतेही काम करू शकाल. ओळखी वाढतील. प्रवासात घाई करू नका.

मिथुन : गोड बोलून तुमची फसवणूक होऊ शकते. अडचणी वाढू शकतात. पोटाची काळजी घ्या. स्पर्धेत जिंकाल.

कर्क : आजचे काम आजच करा. आळस करू नका. चर्चेत यश मिळेल. कोर्टाच्या कामाला गती देता येईल.

सिंह : महत्त्वाचा निर्णय लवकर निश्चित करा. घरातील वाद मिटवता येईल. नोकरीत फायदेशीर बदल होऊ शकेल.

कन्या : विचारांना चालना देणारी घटना घडेल. जुने स्नेही भेटतील. प्रवासाचा बेत ठरवाल. कामे होतील.

तूळ : कामाचा व्याप वाढेल. अंदाज चुकण्याची शक्यता आहे. स्पर्धेत जास्त मेहनत घ्या. ओळख होईल.

वृश्चिक : आज ठरविलेले काम आजच करा. आळस करू नका. वेळेला महत्त्व द्या. धंद्यात लक्ष द्या.

धनु : क्षुल्लक कारणाने तुम्ही उदास व्हाल. कंटाळा येईल. नवीन ओळख होईल. त्यावर जास्त विश्वास ठेऊ नका.

मकर : महत्त्वाचे काम आजच करा. लोकांना एकत्र जमवा. सामाजिक कार्यात वेगाने प्रगती कराल. मैत्री वाढेल.

कुंभ : शेजारी मदत मागण्यासाठी येतील. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

मीन : धंद्यात चांगला जम बसेल. थकबाकी वसूल करा. सामाजिक कार्यात यश मिळेल. केस जिंकाल.