बीटच्या पुर्‍या

Mumbai
Beetroot

बीट हे एक अत्यंत उपयुक्त असे कंद आहे. याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. परंतु ते सहसा जास्त खाण्यात येत नाही. मुलांना जास्त आवडत नाही, तेव्हा त्याच्या पुढे दिल्याप्रमाणे पुर्‍या कराव्यात. पटापट खाल्ल्या जातात व बीट पोटात जाते.

साहित्य :                                                                                                                        एका बीटाचे साल काढून केलेले तुकडे, आले, लसूण, मिरची आवडीप्रमाणे, मीठ चवीनुसार, गव्हाचे पीठ आवश्यकतेनुसार (एका बीटाला साधारण चार वाट्या पीठ लागते), तेल तळणीसाठी, तीळ एक चमचा

कृती :
प्रथम बीटाचे तुकडे व आले, लसूण, मिरची मिक्सरमधे वाटून पेस्ट करून घ्यावे. वाटताना गरज वाटली तर थोडे पाणी वापरावे. जास्त नको. आता एका बाऊलमधे पेस्ट काढून घ्यावी व त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालावे.चवीला मीठ व शोभेसाठी तीळ घालून पाणी घेऊन नेहमीच्या पुरीच्या कणिकेप्रमाणे थोडी घट्ट कणिक मळावी. तेल लावून दहा मिनिटे झाकून ठेवावी. तोपर्यंत गॅसवर कढई तापत ठेवावी व त्यात तेल गरम करावे.आता भिजलेल्या कणिकेच्या लहान-लहान पुर्‍या लाटून तळाव्यात. सॉसबरोबर अथवा नुसत्यापण खाण्यास छान लागतात.