खमंग कुरकुरीत कोबी पकोडा

कोबी पकोडा

Mumbai
cabbage pakora recipe

बऱ्याच जणांना कोबीची भाजी खाण्याचा फार कंटाळा येतो. अशावेळी त्या कोबीच्या भाजीचे काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींनी प्रश्न पडतो. त्यांच्यासाठी आज खास रेसिपी. खमंग कुरकुरीत कोबी पकोडा.

साहित्य

कोबी अर्धा किलो
तांदळाचे पीठ एक वाटी
आले – लसूण पेस्ट २ चमचे
लाल तिखट मसाला १ चमचा
हळद
मीठ
तेल

कृती

सर्वप्रथम कोबी किसून धुवून घ्यावा. त्यानंतर त्यातील पाणी नीतळत ठेवा. नंतर राहिलेले पाणी पीळून काढा आणि आता त्यात आले – लसूण पेस्ट, हळद, मसाला, मीठ, तांदळाचे पीठ सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर छोटे छोटे गोळे करुन मंद आचेवर तळून घ्या. हे पकोडे शेजवान सॉंस बरोबर सर्व्ह करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here