चमचमीत पनीर बुर्जी

चमचमीत पनीर बुर्जी रेसिपी

paneer bhurji recipe in marathi
चमचमीत पनीर बुर्जी

बऱ्याचदा अंड्याची बुर्जी खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पनीर बुर्जी नक्की ट्राय करु शकता. चला तर जाणून घेऊया. पनीर बुर्जीची रेसिपी.

साहित्य

 • १०० ग्रॅम पनीर
 • २ टोमॅटो
 • १ कांदा
 • २ हिरव्या मिर्च्या
 • आलं
 • २ कापलेल्या लसूण पाकळ्या
 • लाल तिखट
 • जिरं
 • लाल मिरची
 • हळद
 • गरम मसाला
 • बुर्जी बनवण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम पनीर बारीक करुन घ्यावे. त्यानंतर तेल गरम करुन त्यात जीरं, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून चांगले परतवून घ्यावे. हे मिश्रण लाल होई पर्यंत परतावे. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून पुन्हा परतवून घ्यावे. आता लाल तिखट घालून त्यात बारीक केलेले पनीर घालून एकजीव करुन घ्यावे. अशाप्रकारे चमचमीत पनीर बुर्जी तयार.