त्वचारोगांवर प्रतिबंधात्मक उपाय

होळी डर्माटोसेस - भाग २

Mumbai
organic color

त्वचारोगांना सुरुवात होऊ नये किंवा ते अधिक तीव्र होऊ नयेत यासाठी तुम्ही कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकता. ते पुढीलप्रमाणे…

होळी खेळण्यापूर्वी
* रासायनिक रंग टाळा, सेंद्रीय रंग वापरा – सेंद्रीय व नैसर्गिक रंगांचा वापर करा. तुम्ही काही रंग घरीही करू शकता. हळद आणि भाजलेले बेसन मिसळून तुम्ही गुलाल तयार करू शकता, यात जास्वंदीचे फूल वाटून घातले तर सुंदर रंग तयार होतो. अतिसंवेदनशील त्वचा, एग्झिमा, सोरायसीस आणि गजकर्णासारखे त्वचाविकार असलेल्यांनी रंगांशी संपर्क टाळणेच उत्तम. किमान रासायनिक रंग तर त्यांनी टाळलेच पाहिजेत.

* खोबरेल तेल, कोरफडीचा गर लावा – रंग खेळण्यापूर्वी केस व डोक्याच्या त्वचेवर खोबरेल तेल लावा, म्हणजे त्वचेची रंध्रे रंगामुळे बंद होणार नाहीत. तसेच त्वचेवर सुरक्षेचे एक आच्छादन तयार करण्यासाठी कोरफडीचा गर व तेल लावा. कानाच्या भागावर कोरफड व तेल लावण्यास विसरू नका.

* डोळे, नखांची घ्या काळजी – डोळ्यात रंग गेल्यास लगेच डोळे धुऊन टाका. डोळ्यांतून रंग बाहेर यावा म्हणून पापण्यांची उघडझाप करू नका, त्यामुळे केवळ हानी होईल. तसेच नखांवर पारदर्शक नेलपेंट लावा. नखांच्या आतल्या बाजूनेही हे नेलपेंट लावा, जेणेकरून नखांद्वारे रंग त्वचेमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

* त्वचेचे, ओठांचे करा संरक्षण – त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी त्वचेवर सन स्क्रीन लोशन लावा. त्याचप्रमाणे ओठांची आर्द्रता कायम राखण्यासाठी त्यावर व्हॅसलिन लावा. तुम्ही कानांवरही व्हॅसलिन लावू शकता आणि नियमित पाणी व फळांचे रस पित राहून शरीरातील आर्द्रता कायम राखा.

होळी खेळून झाल्यावर
* एकदा का मनसोक्त रंग खेळून झाले की मग त्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यायची यावर लक्ष केंद्रित करा.
* भरपूर पाणी वापरून चेहरा आणि अंग धुऊन काढा.
* बेबी ऑईलचा वापर करून त्वचा स्वच्छ करा.
* रंग खेळल्यानंतर किमान ४८ तास त्वचा घासू (स्क्रबिंग) नका.
* त्वचेचे एक्सफॉलिएशन आणि क्लिंजिंग करण्यासाठी दही किंवा बेसनासारखे नैसर्गिक घटक वापरा.
* अंघोळ झाल्यानंतर संपूर्ण अंगाला मॉइश्चरायझर लावून त्यातील आर्द्रता कायम राहील याची खात्री करा.
* काही वेगळे आढळल्यास त्वचेसाठी तत्काळ उपचार घ्या.
* हे सोपे उपाय केलेत तर तुम्हाला होळीचा आनंदही लुटता येईल आणि तुमची त्वचा निरोगी व मुलायम राखता येईल.

डॉ. रिंकी कपूर,
लेखिका त्वचारोगतज्ज्ञ आहेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here