घरलाईफस्टाईलSweet Recipe: अननस वडी

Sweet Recipe: अननस वडी

Subscribe

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अननस दाखल होतात. अशावेळी अननसाच्या कोणत्या रेसिपी कराव्यात असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अननाची वडी कशी करायची ते सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी अननसाचे तुकडे
  • २ चमचे लाल भोपळ्याच्या बिया
  • १ वाटी कॉर्नफ्लॉवर
  • १ वाटी साखर
  • ४ चमचे तूप
  • काजूचे तुकडे

कृती

सर्वप्रथम अननसाचे तुकडे आणि भोपळ्याच्या बिया मिक्सरला लावून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करुन त्यात कॉर्नफ्लॉवर चांगले परतवून घ्या. नंतर त्यात अननस आणि लाल भोपळ्याच्या बियांची तयार पेस्ट चांगली एकजीव करुन घ्या. त्यात साखर घालून वितळेपर्यंत चांगले परतवून घ्या. मिश्रण चांगले घट्ट करुन. त्यानंतर ट्रेला तूप लावून नंतर त्यात ते सारण सेट करुन त्यावर काजू लावून घ्या. बर्फी सेट झाल्यानंतर त्याचे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये काप करुन घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -