घरमहा @२८८भंडारा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६१

भंडारा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६१

Subscribe

भंडारा जिल्ह्यात भंडारा विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६१) आहे.

भंडारा हे शहर भंडारा जिल्ह्याचे प्रमुख शहर आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सर्व प्रमुख मुख्यालये या शहरातच आहेत. तांदूळ उत्पादनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. २०११च्या जनगननेनुसार भंडारा विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या २ लाख ८० हजार ३० इतकी आहे. हा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा अविभाज्य घटक आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,७३,१२७
महिला – १,६८,०४६
एकूण मतदार – ३,४१,१८५

- Advertisement -

विद्यमान आमदार – अॅड. रामचंद्र पुनाजी अवसरे, भाजप

mla ramchandra awsare
विद्यमान आमदार अॅड. रामचंद्र अवसरे

अॅड. रामचंद्र पुनाजी अवसरे हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. २०१४ साली त्यांनी भंडारा मतदारसंघातून पहिल्यांदा भाजदपच्या तिकिटावर उमेदवारी लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांचा प्रचंड मतांनी विजय झाला होता. अवसरे १९८६ ते १९९० पवनी नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अॅड. रामचंद्र अवसरे, भाजप – ८३,४०८
२) श्रीमती देवांगना गाढवे, बसप – ४६,५७६
३) नरेंद्र भोंडेकर, शिवसेना – ४२,७६६
४) युवराज वासनिक, काँग्रेस – ३०,६५५
५) सच्चिदानंद फुलेकर, राष्ट्रवादी – १५,२४३


हेही वाचा – ११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -