घरमहा @२८८भुसावळ विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१२

भुसावळ विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१२

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (विधानसभा क्र.१२) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भुसावळ येथे रेल्वे जंक्शन आहे. केळीची परराज्यात मोठी वाहतूक या ठिकाणाहून चालते. आशिया खंडातील मोठे रेल्वे यार्ड म्हणून भूसावळची ओळख आहे. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. तापी नदीच्या तीरावर वसलेले शहर असून भुसावळच्या शेजारीच दोन मोठे आयुध निर्माण कारखाने, एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कॉंग्रेस पक्षाकडून पुष्पा सोनवणे यांनी मागील पंचवार्षिकला निवडणूक लढली होती. त्यांना ४ नंबरची मते मिळाली होती. यावेळी आघाडी झाली असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हे कोणता उमेदवार देतात याबाबत चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीकडून विनोद सोनवणे हे इच्छुक आहेत.

मतदारसंघ क्रमांक : १२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : अनुसूचीत जाती

मतदार संख्या
पुरुष : १,६०,६५९
स्त्री : १,४६,३२४
इतर : २२
एकूण : ३,०७,००५

- Advertisement -

विद्यमान आमदार : संजय सावकारे, भाजप

भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. येथे संजय सावकारे विजयी झाले होते. साली त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राजेश झाल्टे यांनी तुल्यबळ लढत दिली होती. यावेळी मात्र त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसून त्यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी नाव म्हणून डॉ. मधु राजेश मानवतकर यांनी दावेदारी केली आहे. त्याविषयी त्यांनी प्रचार प्रसार सुरु केला असून जाहिरातीदेखील केल्या आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार आ.सावकारे पुन्हा राहतील की डॉ.मानवतकर याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. आ.सावकारे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. आ.सावकारे हे ना. गिरीश महाजन यांचेशी सख्य करून असले तरीही अंतिम निर्णय काहीही होवू शकतो. हा मतदारसंघ एससी वर्गासाठी राखीव आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आठवड्यापूर्वी सतीश घुले यांची उमेदवारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी जाहीर केली. प्रदेशाकडून देखील हेच नाव येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले घुले हे आता विधानसभा रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेकडून मागील पंचवार्षिकला संजय ब्राह्मणे यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढली होती. त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. यावेळी देखील ते इच्छुक असून तिकीट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकार

2014 विधानसभा परिस्थिती

संजय सावकारे – भाजप – 84814
राजेश झालटे – राष्ट्रवादी – 53811
संजय ब्राम्हणे – सेना – 5598
पुष्पा सोनवणे – काँग्रेस- 3005


हे देखील वाचा – ४ रावेर लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -