घरमहा @२८८कणकवली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६८

कणकवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६८

Subscribe

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कणकवली (विधानसभा क्र. २६८) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

कणकवली विधानसभा मतदार संघ हा रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदार संघातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख मतदार संघ आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात वैभववाडी, कणकवली आणि देवगड या तीन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात २६८ गावं येतात. कणकवली हा नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात गाबीत, मराठा या समाजाचे वर्चस्व आहे.

मतदारसंघ क्रमांक – २६८

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या 

पुरूष – १,०९,१०९
महिला – १,१४,८०१
एकूण – २,२३,९१०

- Advertisement -

विद्यमान आमदार

कणकवली मतदारसंघाचे नितेश नारायण राणे हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत नितेश नारायण राणे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या प्रमोद जठार यांचा दारूण पराभव केला. नितेश राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे घरातच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. नितेश राणे हे उच्चशिक्षित असून त्यांना वाचन आणि सामाजिक कार्याची आवड आहे.

nitesh-rane
विद्यमान आमदार – नितेश राणे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) नितेश नारायण राणे, काँग्रेस – ७४,७१५
२) प्रमोद जठार, भाजप – ४८,७३६
३) सुभाष मयेकर, शिवसेना – १२,८६३
४) अतुल राणे, राष्ट्रवादी काँग्रेस – ८,१९६
५) विजय सावंत, अपक्ष – ७,२१५

- Advertisement -

हेही वाचा – उमरेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५१

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -