घरमहा @२८८मलकापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २१

मलकापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (विधानसभा क्र. २१) विधानसभा मतदारसंघ आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा क्रमांक २१ वा विधानसभा मतदारसंघ आहे. मलकापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात आजवरच्या इतिहासात केवळ दोनच वेळा काँग्रेसला विजय मिळवता आला आहे. ते वगळता मलकापूर कायमच भाजपच्या ताब्यात राहिला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार चैनसुख संचेती या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी मतभेद विसरून काँग्रेस उमेदवाराला विजयी करू, असा निश्चय काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे काँग्रेस उमेदवार निश्चितच भाजपा आमदार संचेती यांना आव्हान देणार असे सध्याचे चित्र आहे.

मतदारसंघ क्रमांक – २१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – ९१,८९६
महिला – ७५,६७१

- Advertisement -

एकूण मतदार – १,६७,५६७

विद्यमान आमदार – चैनसुख मदनलाल संचेती, भाजप

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील नेते म्हणून राज्याच्या राजकारणात आमदार चैनसुख संचेती यांना ओळखले जाते. सलग २२ वर्ष मलकापूर विधानसभा मतदारसंघावर राजकीय वर्चस्व गाजवणारे आमदार चैनसुख संचेती यांनी विधानसभेची पहिली निवडणूक १९९५ साली अपक्ष लढवून विधानसभेत दमदार एन्ट्री केली. सुरुवातीपासूनच जनसंघाशी जवळचा संबंध असल्याने परत भाजपत प्रवेश करून सत्ता नसतानाही पक्षाशी एकनिष्ठता ठेवली. विकासकामांना वेळोवेळी प्राधान्य दिले गेल्याने जनतेसोबत त्यांची नाळ जुळली गेली आहे. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील पदे भूषवून त्यांनी मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराज्या संधी उपलब्ध करून दिल्या.

MLA chainsukh madanlal sancheti
चैनसुख मदनलाल संचेती, भाजप

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) चैनसुख संचेती, भाजप – ७५,९६५

२) डॉ. अरविंद कोलते, काँग्रेस – ४९,०१९

३) वसंतराव भोजणे, शिवसेना – २६,२९१

४) संतोष रायपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस – ५,७४१

५) योगेंद्र कोलते, बसपा – ३,७७०


हे वाचा – रावेर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -