मोर्शी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४३

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी (विधानसभा क्र. ४३) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

Amaravati
मोर्शी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४३

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११ च्या जनगननेनुसार मोर्शीची लोकसंख्या १,८२,४८४ आहे. डॉ. अनिल बोंडे हे मोर्शीचे विद्यमान आमदार आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ४३

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४०,४६२
महिला – १,२५,३११
एकूण मतदार – २,६५,७७३

विद्यमान आमदार – डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे, भाजप

डॉ. अनिल बोंडे हे उच्च शिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण एम.बी.बी.एस., एम.डी. आहे. २००२ ते २००५ ते अमनरावती जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते. २००९ ते २०१४ ते जनसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राहिले. २००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यानंतर २०१४ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली. भाजपच्या तिकीटावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते जिंकून आले.

mla dr. anil bonde
विद्यमान आमदार डॉ. अनिल बोंडे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. अनिल बोंडे, भाजप – ७१,६११
२) हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी – ३१,४४९
३) नरेशचंद्र ठाकूर, काँग्रेस – ३०,२०७
४) उमेश यावलकर, शिवसेना – २७,१२२
५) डॉ. मृदूला पाटील, बसपा – १२,८५२


हेही वाचा – ८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ