सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७०

सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख मतदार संघ आहे.

270
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७०

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सावंतवाडी हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांचा समावेश होतो.

मतदारसंघ क्रमांक – २७०

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या 

पुरूष – १,१०,१४७
महिला – १,०८,८९१
एकूण – २,१९,०३८

विद्यमान आमदार – दिपक वसंतराव केसरकर

dipak-kesarkar-mla
विद्यमान आमदार – दिपक वसंतराव केसरकर

सावंतवाडी मतदारसंघाचे दिपक वसंतराव केसरकर हे विद्यमान आमदार आहेत. दिपक केसरकर हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या दिपक केसरकर यांनी भाजपच्या राजन तेलींचा दारूण पराभव केला. दिपक केसरकर हे उच्चशिक्षित असून त्यांना वाचनाची तसेच विविध खेळांची आवड आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) दिपक वसंतराव केसरकर, शिवसेना – ७०,९०२
२) राजन तेली, भाजप – २९,७१०
३) चंद्रकांत गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस – २५,३७६
४) सुरेश दळवी, काँग्रेस – ९,०२९
५) परशुराम उपरकर, मनसे – ६,१२९


हेही वाचा – कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६९