घरमहाराष्ट्रबदला घेण्यासाठी तरुणाने शेअर केले प्रेयसीचे अश्लील फोटो

बदला घेण्यासाठी तरुणाने शेअर केले प्रेयसीचे अश्लील फोटो

Subscribe

पिंपरी चिंचवड परिसरात राहत असलेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकून तिचा मोबाईल नंबर शेअर केला आहे. या प्रकरणी या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाने प्रेयसीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते लोकॅन्टो (मोबाईल डेटिंग अॅप) सह इतर वेबसाईटवर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित पीडित तरुणीने चिखली पोलिसात फिर्याद दिली असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे मात्र आता ते वेगवेगळे राहतात. आरोपी हा चेन्नई येथील असून टी. आश्विन अस नाव आहे. त्याने लोकॅन्टो अॅपवर तरुणीचा मोबाईल नंबर आणि अश्लील फोटो पोस्ट केले आहेत. यानंतर या तरुणीला अश्लील फोन येऊ लागले.

चेन्नईतील रुग्णालयात करत होते एकत्र काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टी.आश्विन आणि पीडित तरुणी हे चेन्नई येथे एकाच रुग्णालयात नोकरी करत होते. त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर दोघे ही एकत्र राहायला लागले होते. आरोपीने संबंधित पीडित तरुणीला लिव्ह इन रिलेशनशिप ठेवण्यास भाग पाडले. आरोपी हा तरुणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढायचा, तसेच तरुणी रुमध्ये कपडे बदलत असताना व्हिडिओही काढायचा असे फिर्यादीने आरोप केले आहेत. आरोपीला लग्न करायचे नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान काही महिण्यापासून संबंधित तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास आली होती. आरोपी टी.आश्विन याने अश्लील फोटो लोकॅन्टो ऍप,एक्स हॅमस्टर व इतर वेबसाईटवर व्हारल केले आहेत. दरम्यान संबंधित पीडित तरुणीच्या नावाने लोकॅन्टो ऍपवर पोस्ट तयार केली असून तरुणीचा अश्लील फोटो वापरत मोबाईल नंबर दिला आहे. त्यामुळे तरुणीला मोबाईल वर फोन आल्यानंतर सदर घटना समोर आली आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -